यशया 65 : 1 (IRVMR)
{बंडखोरांना शासन} [PS] ज्यांनी विचारले नाही, त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो. [QBR] ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा नाही केला, त्यांना मी म्हणालो, मी इथे आहे! मी इथे आहे! [QBR]
यशया 65 : 2 (IRVMR)
मी पूर्ण दिवस आपला हात त्या लोकांसाठी पसरला जे हट्टी आहेत, [QBR] जे चांगल्या मार्गाने चालत नाहीत, जे आपल्याच कल्पना योजतात आणि आपल्याच विचारांच्या मागे चालतात. [QBR]
यशया 65 : 3 (IRVMR)
ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, [QBR] ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात. [QBR]
यशया 65 : 4 (IRVMR)
ते कबरींमध्ये बसून रात्रभर पहातात, [QBR] आणि डुकराचे मांस खातात व त्यांच्या पात्रांत ओंगळ मासाचा रस्सा असतो. [QBR]
यशया 65 : 5 (IRVMR)
तरी ते असे म्हणतात, ‘दुर उभा राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे. [QBR] या गोष्टी माझ्या नाकात जाणाऱ्या धुराप्रमाणे आहेत, अशी अग्नी जी सतत जळत राहते. [QBR]
यशया 65 : 6 (IRVMR)
“पाहा, हे माझ्या समोर लिहीले आहे, [QBR] मी गप्प बसणार नाही, पण त्यांना परत फेड करीन, त्यांचे अन्याय मी त्यांच्या पदरी भरून देईन.” [QBR]
यशया 65 : 7 (IRVMR)
“त्यांची पापे आणि त्यांच्या वडिलांची पापे मी त्यांच्या पदरी भरून देईन.” परमेश्वर असे म्हणतो. [QBR] “पर्वतांवर धूप जाळण्याबद्दल आणि टेकड्यांवर माझी थट्टा केल्या बद्दल मी त्यांना त्याची परत फेड करीन. [QBR] मी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून देईन.” [QBR]
यशया 65 : 8 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घडांत जेव्हा रस आढळतो, [QBR] तेव्हा कोणी म्हणते, त्याचा नाश करू नका, कारण त्यामध्ये काही चांगले आहे.” [QBR] मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही. [QBR]
यशया 65 : 9 (IRVMR)
मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन. [QBR] माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील. [QBR]
यशया 65 : 10 (IRVMR)
मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. [QBR] या सर्व गोष्टी, ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील. [QBR]
यशया 65 : 11 (IRVMR)
“पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता. [QBR]
यशया 65 : 12 (IRVMR)
पण मी तुम्हास तलवारीसाठी नेमले आहे, आणि तुम्ही सर्व वधण्यासाठी वाकवले जाल, [QBR] कारण मी जेव्हा बोलाविले, तुम्ही उत्तर दिले नाही, जेव्हा मी बोललो, तुम्ही ऐकले नाही; [QBR] त्याऐवजी तुम्ही माझ्या नजरेत जे वाईट ते केले, आणि मला आवडत नसलेल्या गोष्टी करण्याची तुम्ही निवड केली.” [PE][PS]
यशया 65 : 13 (IRVMR)
तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही भुकेले रहाल. [QBR] माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले रहाल.” [QBR] माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल. [QBR]
यशया 65 : 14 (IRVMR)
माझ्या सेवकांच्या हृदयांत आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील. [QBR] पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, आणि आत्म्याच्या भंगाने तुम्ही आक्रंदन कराल. [QBR]
यशया 65 : 15 (IRVMR)
तुम्ही तुमची नावे माझ्या निवडलेल्यांसाठी बोलावे म्हणून शाप अशी ठेवून जाणार. मी, प्रभू परमेश्वर, तुम्हास ठार मारील. [QBR] मी माझ्या सेवकांना नव्या नावाने बोलावील. [QBR]
यशया 65 : 16 (IRVMR)
जो कोणी पृथ्वीवर आपणाला आशीर्वाद देईल, तो सत्याच्या देवाच्या ठायी स्वत:ला आशीर्वाद देईल. [QBR] जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो, तो सत्याच्या देवाची शपथ वाहील. [QBR] कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत.
यशया 65 : 17 (IRVMR)
{नवे आकाश व नवी पृथ्वी} [PS] कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार, [QBR] आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही. [QBR]
यशया 65 : 18 (IRVMR)
पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदासर्वकाळ आनंद व उल्लास कराल. पाहा! मी यरूशलेमेला हर्ष आणि तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणीन. [QBR]
यशया 65 : 19 (IRVMR)
“मी यरूशलेमविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन सुखी होईन.” [QBR] तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही. [QBR]
यशया 65 : 20 (IRVMR)
तिच्या मध्ये काही दिवस जगेल असे तान्हे बाळ, [QBR] किंवा वृद्ध मनुष्य त्याच्या काळाआधी मरण पावणार नाही. जो शंभर वर्षांचा होऊन मरण पावला, तर तो एक तरुण व्यक्ती म्हणून गणला जाईल. [QBR] शंभर वर्षात मरण पावलेला एक पापी मनुष्य शाप समजला जाईल. [QBR]
यशया 65 : 21 (IRVMR)
“ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.” [QBR]
यशया 65 : 22 (IRVMR)
एकाने घर बांधायचे व त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्षमळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. [QBR] कारण झाडाच्या दिवसांप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील. [QBR]
यशया 65 : 23 (IRVMR)
ते व्यर्थ श्रम करणार नाहीत, किंवा तात्काळ दहशत गाठील अशाला ते जन्म देणार नाहीत. [QBR] कारण ते आपल्या संततीसहीत परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्यांची मुले आहेत. [QBR]
यशया 65 : 24 (IRVMR)
त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन. [QBR]
यशया 65 : 25 (IRVMR)
लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. [QBR] पण धूळ ही सापाचे अन्न होईल. [QBR] माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो. [PE]
❮
❯