यशया 7 : 1 (IRVMR)
आहाजाला यशयाचा पहिला संदेश
2 राजे 16:5; 2 इति. 28:5-15 यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही.
यशया 7 : 2 (IRVMR)
दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम * इस्राएलच्या उत्तरेकडील राज्य हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली.
यशया 7 : 3 (IRVMR)
मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा.
यशया 7 : 4 (IRVMR)
त्यास सांग, सावध हो, शांत रहा, भिऊ नको किंवा या दोन जळत्या कोलीतांमुळे रसीन, अराम, आणि रमाल्याचा पुत्र पेकह यांच्या उग्र क्रोधामुळे खचून जाऊ नको.
यशया 7 : 5 (IRVMR)
अराम, एफ्राईम, व रमाल्याच्या पुत्राने तुमच्या विरूद्ध दुष्ट योजना केली आहे, ते म्हणतात,
यशया 7 : 6 (IRVMR)
आपण यहूदावर चालून जाऊ व त्यास घाबरे करू, त्याची तटबंदी फोडून तेथे ताबेलाच्या पुत्राला राजा करु.
यशया 7 : 7 (IRVMR)
प्रभू परमेश्वर म्हणतो, असे काही होणार नाही; असे काही घडणार नाही,
यशया 7 : 8 (IRVMR)
कारण अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन आहे. पासष्ट वर्षांच्या आत एफ्राईम भंग पावेल व तेथील लोक एक राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.
यशया 7 : 9 (IRVMR)
एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.”
यशया 7 : 10 (IRVMR)
इम्मानुएलसंबंधी यशयाचा संदेश परमेश्वर पुन्हा आहाजाशी बोलला,
यशया 7 : 11 (IRVMR)
“तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.”
यशया 7 : 12 (IRVMR)
परंतु आहाज म्हणाला, “मी मागणार नाही किंवा परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
यशया 7 : 13 (IRVMR)
मग यशयाने उत्तर दिले, “दावीदाच्या घराण्या, ऐक लोकांच्या धीराला तुम्ही कसोटीला लावले ऐवढे पुरे नाही काय? माझ्या देवाच्या सहनशीलतेला पण तुम्ही कसोटीला लावावे काय?
यशया 7 : 14 (IRVMR)
म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल, पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल.
यशया 7 : 15 (IRVMR)
तो वाईटाला नाकारील आणि चांगले ते पसंत करणे हे जेव्हा त्यास समजेल तेव्हा तो लोणी व मध यांचे सेवन करील.
यशया 7 : 16 (IRVMR)
कारण त्या मुलाला वाईट नाकारून व चांगले ते पसंत करावे हे कळू लागण्याआधीच ज्या दोन राजांची तुला धास्ती पडली आहे त्यांची भूमी उजाड होईल.
यशया 7 : 17 (IRVMR)
एफ्राईम यहूदापासून वेगळा आला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुझ्यावर, तुझ्या लोकांवर आणि तुझ्या वडिलाच्या घराण्यावर आणील; तो अश्शूरच्या राजाला तुजविरूद्ध आणील.”
यशया 7 : 18 (IRVMR)
त्यावेळी मिसरच्या दूरच्या ओढ्यांमधून माशीला व अश्शूर देशातील मधमाशीला परमेश्वर शीळ घालून बोलावील.
यशया 7 : 19 (IRVMR)
त्या सगळ्या खोऱ्यात व खडकाच्या कपारीत सगळ्या काटेरी झुडपात व सर्व कुरणांत तळ देतील.
यशया 7 : 20 (IRVMR)
त्यावेळी प्रभू अश्शूरच्या राजाचा एका भाड्याने घेतलेल्या वस्तऱ्याप्रमाणे उपयोग करून, तुमच्या डोक्याच्या व पायांच्या केसांचा मुंडण करील तो तुमची दाढी देखील तासून काढील.
यशया 7 : 21 (IRVMR)
त्या दिवशी मनुष्य एक कालवड व दोन मेंढ्या पाळील.
यशया 7 : 22 (IRVMR)
आणि त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल, कारण देशात मागे राहीलेला प्रत्येक मनुष्य लोणी व मध खाईल.
यशया 7 : 23 (IRVMR)
त्यावेळी जेथे हजार शेकेल चांदीच्या† साधारण 11.5 किलोग्राम नाण्याएवढ्या किंमतीची हजार द्राक्षवेली होत्या, तेथे तण आणि काटेकुटे याव्यतिरिक्त काहीही राहणार नाही
यशया 7 : 24 (IRVMR)
माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील कारण सर्व भूमी तण व काटेकुटे यांनी भरलेली असते.
यशया 7 : 25 (IRVMR)
ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणून शेती करीत त्या सर्वापासून ते काटेरीझुडपांच्या भीतीमुळे दूर राहतील, पण गुरेढोरे व मेढ्या तेवढ्या चरण्यासाठी तेथे जातील.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25