यशया 9 : 1 (IRVMR)
शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द
यश. 11:1-9 जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल. मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची, अप्रतिष्ठा केली, पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील.
यशया 9 : 2 (IRVMR)
जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे; जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे.
यशया 9 : 3 (IRVMR)
तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे, हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो, लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत.
यशया 9 : 4 (IRVMR)
कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे.
यशया 9 : 5 (IRVMR)
कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील ती अग्नीला भक्ष होतील.
यशया 9 : 6 (IRVMR)
कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, समर्थ देव* एल-गिभोर , सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील.
यशया 9 : 7 (IRVMR)
त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
यशया 9 : 8 (IRVMR)
इस्राएलावर परमेश्वराचा कोप प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे.
यशया 9 : 9 (IRVMR)
सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,
यशया 9 : 10 (IRVMR)
“विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”
यशया 9 : 11 (IRVMR)
म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील;
यशया 9 : 12 (IRVMR)
पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.
यशया 9 : 13 (IRVMR)
तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.
यशया 9 : 14 (IRVMR)
म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.
यशया 9 : 15 (IRVMR)
नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.
यशया 9 : 16 (IRVMR)
जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात.
यशया 9 : 17 (IRVMR)
म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही, कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते. या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील.
यशया 9 : 18 (IRVMR)
दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते; वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात.
यशया 9 : 19 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत, आपल्या भावाचीही कोणी मनुष्य गय करीत नाही.
यशया 9 : 20 (IRVMR)
ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत. प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील.
यशया 9 : 21 (IRVMR)
मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील. कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21