याकोब 2 : 1 (IRVMR)
श्रीमंत व गरीब ह्यांच्याशी वागणूक माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका
याकोब 2 : 2 (IRVMR)
कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला,
याकोब 2 : 3 (IRVMR)
तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.”
याकोब 2 : 4 (IRVMR)
तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना?
याकोब 2 : 5 (IRVMR)
माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
याकोब 2 : 6 (IRVMR)
पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही?
याकोब 2 : 7 (IRVMR)
आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?
याकोब 2 : 8 (IRVMR)
खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात.
याकोब 2 : 9 (IRVMR)
पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.
याकोब 2 : 10 (IRVMR)
कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.
याकोब 2 : 11 (IRVMR)
कारण ज्याने म्हणले की, “व्यभिचार करू नको,” त्यानेच म्हणले की, “खून करू नको” आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास.
याकोब 2 : 12 (IRVMR)
तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा.
याकोब 2 : 13 (IRVMR)
कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.
याकोब 2 : 14 (IRVMR)
श्रद्धा व कार्य ह्यावर सूचना माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय?
याकोब 2 : 15 (IRVMR)
जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल,
याकोब 2 : 16 (IRVMR)
आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ?
याकोब 2 : 17 (IRVMR)
म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
याकोब 2 : 18 (IRVMR)
आता, कोणी मनुष्य म्हणेल की, “तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत.” तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन.
याकोब 2 : 19 (IRVMR)
एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.
याकोब 2 : 20 (IRVMR)
परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय?
याकोब 2 : 21 (IRVMR)
आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय?
याकोब 2 : 22 (IRVMR)
आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का?
याकोब 2 : 23 (IRVMR)
‘अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व गणण्यात आले’, हे म्हणणारा शास्त्रलेख पूर्ण झाला आणि त्यास देवाचा मित्र म्हणण्यात आले.
याकोब 2 : 24 (IRVMR)
तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो.
याकोब 2 : 25 (IRVMR)
तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय?
याकोब 2 : 26 (IRVMR)
कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26