यिर्मया 17 : 1 (IRVMR)
{यहूदाच्या हृदयपटावर कोरलेले पातक} [PS] “यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे. [QBR] ते त्यांच्या हृदयाच्या पाटीवर आणि वेदीच्या शिंगांवर कोरले आहेत. [QBR]
यिर्मया 17 : 2 (IRVMR)
त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात. [QBR]
यिर्मया 17 : 3 (IRVMR)
विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत. [QBR]
यिर्मया 17 : 4 (IRVMR)
मी दिलेला वारसा तू गमावशील. [QBR] मी तुमच्या शत्रूंना तुम्हास गुलाम म्हणून अज्ञान भूमीत देईन. [QBR] कारण माझ्या क्रोधात तू अग्नी पेटवला आहे, जो सर्वकाळ जळत राहीन.” [QBR]
यिर्मया 17 : 5 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, [QBR] जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो. [QBR]
यिर्मया 17 : 6 (IRVMR)
कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही. [QBR] तो निर्जन, कोरड्या व बरड जमिनीवर व रहिवासी नसलेल्या जागी वस्ती करीन. [QBR]
यिर्मया 17 : 7 (IRVMR)
परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे. [QBR]
यिर्मया 17 : 8 (IRVMR)
तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते, [QBR] तो हे पाहत नाही की उन्हाची झळ येत आहे, कारण त्याची पाने हिरवीगार राहतात. [QBR] मग दुष्काळाच्या वर्षाच्या काळात तो चिंताग्रस्त होणार नाही, किंवा तो फळ देण्याचे थांबवणार नाही.” [QBR]
यिर्मया 17 : 9 (IRVMR)
हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार? [QBR]
यिर्मया 17 : 10 (IRVMR)
मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास, [QBR] मी परमेश्वर, मनाचा शोध घेतो, मी हृदय पारखतो. [QBR]
यिर्मया 17 : 11 (IRVMR)
अन्यायाने जो श्रीमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे. [QBR] पण त्याच्या आयुष्याच्या मध्यांनात, ती संपत्ती त्यास सोडील. तो शेवटी एक मूर्ख असेल. [QBR]
यिर्मया 17 : 12 (IRVMR)
आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन, जे सुरुवातीपासून भारदस्त आहे. [QBR]
यिर्मया 17 : 13 (IRVMR)
परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल. [QBR] कारण त्यांनी परमेश्वरास जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्यास सोडले आहे. [QBR]
यिर्मया 17 : 14 (IRVMR)
परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस. [QBR]
यिर्मया 17 : 15 (IRVMR)
पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.” [QBR]
यिर्मया 17 : 16 (IRVMR)
मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. [QBR] हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे. [QBR]
यिर्मया 17 : 17 (IRVMR)
तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस. [QBR]
यिर्मया 17 : 18 (IRVMR)
माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो. [QBR] अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक. [PS]
यिर्मया 17 : 19 (IRVMR)
{शबेबाथ पवित्र राखायला हवा} [PS] परमेश्वराने मला असे म्हटले: “यहूदाचे राजे यरूशलेमेच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या द्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांस सांग. मग यरूशलेमेच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.
यिर्मया 17 : 20 (IRVMR)
त्यांना सांग, यहूदाच्या राजांनो आणि सर्व यहूदा लोकांनो व यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
यिर्मया 17 : 21 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो: तुम्ही आपला जीव जपा आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरूशलेमेच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका.
यिर्मया 17 : 22 (IRVMR)
आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.
यिर्मया 17 : 23 (IRVMR)
पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात.
यिर्मया 17 : 24 (IRVMR)
असे होईल की, जर तुम्ही खचित माझे ऐकाल आणि शब्बाथाच्या दिवस पवित्र पाळण्यासाठी, यरूशलेमेच्या प्रदेशद्वारातून तुम्ही ओझी आणली नाहीत आणि त्या दिवशी काम नाही केले, परमेश्वर असे म्हणतो.
यिर्मया 17 : 25 (IRVMR)
तर या नगराच्या दारातून दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि सरदार, रथांमधे व घोड्यावर बसून आत जातील, ते व त्यांचे सरदार, यहूदा आणि यरूशलेमेत राहणारे, आत जातील, आणि हे नगर सर्वकाळ राहीन.
यिर्मया 17 : 26 (IRVMR)
ते सर्व यहूदा आणि यरूशलेमेच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून, आणि बन्यामीनच्या देशातून आणि खालच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून, होमार्पण आणि धान्यार्पण, यज्ञ व धूप आणतील आणि उपकारस्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील.
यिर्मया 17 : 27 (IRVMR)
पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: