यिर्मया 51 : 1 (IRVMR)
{बाबेलविषयी परमेश्वराचा निर्णय} [PS] परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि [QBR] लेब-कामाईत [* बाबेलचे आणखीन एक नाव] जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने [† आत्म्याने] खळबळ उडवीन. [QBR]
यिर्मया 51 : 2 (IRVMR)
मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील, [QBR] कारण ते तिला अरिष्टाच्या दिवशी चहूकडून तिच्याविरूद्ध होतील. [QBR]
यिर्मया 51 : 3 (IRVMR)
तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये. [QBR] तिच्या तरुणांना वाचवू नको. तिच्या सर्व सैन्याला विध्वंसकाच्या हवाली कर. [QBR]
यिर्मया 51 : 4 (IRVMR)
कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील. [QBR]
यिर्मया 51 : 5 (IRVMR)
कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे, [QBR] तरी इस्राएलास व यहूदास, त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने त्यांना सोडले नाही. [QBR]
यिर्मया 51 : 6 (IRVMR)
बाबेलामधून पळून जा. प्रत्येक मनुष्याने आपणास वाचवावे. तिच्या अन्यायात नष्ट होऊ नये. [QBR] कारण परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे. तो तिला तिचे सर्व प्रतिफळ भरून देईल. [QBR]
यिर्मया 51 : 7 (IRVMR)
बाबेल परमेश्वराच्या हातातील सोन्याचा पेला होता, तिने सर्व देशाला धुंद केले आहे. [QBR] राष्ट्रे तिचा द्राक्षरस प्याली आणि ते विवेकशून्य झाले. [QBR]
यिर्मया 51 : 8 (IRVMR)
बाबेल अकस्मात पडेल आणि नाश होईल. त्याची शकले पडतील. [QBR] तिच्यासाठी शोक करा. तिच्या वेदनेसाठी तिला औषध द्या. कदाचित् ती बरी होईल. [QBR]
यिर्मया 51 : 9 (IRVMR)
बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व [QBR] दूर आपल्या देशात जाऊ. कारण तिचा गुन्हा आकाशास पोहचला आहे; त्याचा आभाळापर्यंत ढीग झाला आहे. [QBR]
यिर्मया 51 : 10 (IRVMR)
परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या, [QBR] परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या. [QBR]
यिर्मया 51 : 11 (IRVMR)
बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराने माद्य राजाचा आत्म्यास चिथावणी दिली आहे [QBR] कारण बाबेलाचा नाश करावा अशी त्याची योजना होती. [QBR] कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याचे मंदिर उध्वस्त केल्याबद्दलचा सूड आहे. [QBR]
यिर्मया 51 : 12 (IRVMR)
बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा. [QBR] पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा, [QBR] कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे. [QBR]
यिर्मया 51 : 13 (IRVMR)
तुम्ही लोक जे बहुत पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतात, जे तुम्ही लोक खजिन्यांनी धनवान आहात, [QBR] तुझा शेवट आला आहे. तुझ्या आयुष्याची दोरी आता संक्षीप्त केली आहे. [QBR]
यिर्मया 51 : 14 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वराने आपल्याच जीविताची शपथ वाहिली आहे की, “टोळाच्या पीडेप्रमाणे, मी तुला तुझ्या शत्रूंनी भरीन.” [QBR] ते तुझ्याविरूद्ध युद्धाची आरोळी करतील. [QBR]
यिर्मया 51 : 15 (IRVMR)
त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने कोरडी भूमी स्थापिली [QBR] आपल्या बुद्धीने आकाश पसरिले; [QBR]
यिर्मया 51 : 16 (IRVMR)
जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो. [QBR] तो पावसासाठी वीजा निर्माण करतो आणि आपल्या कोठारातून वारा काढून पाठवतो. [QBR]
यिर्मया 51 : 17 (IRVMR)
प्रत्येक मनुष्य पशूसारखा ज्ञानहीन झाला आहे; प्रत्येक धातु कारागीर आपल्या मूर्तीमुळे लज्जित झाला आहे. [QBR] कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत. तेथे त्यांच्यात जीवन नाही. [QBR]
यिर्मया 51 : 18 (IRVMR)
त्या निरुपयोगी आहेत, त्या चेष्टेचे काम आहे. त्यांच्या शिक्षेच्या दिवशी त्या नष्ट होतील. [QBR]
यिर्मया 51 : 19 (IRVMR)
पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; [QBR] त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. [QBR]
यिर्मया 51 : 20 (IRVMR)
तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस. [QBR] तुझ्याबरोबर मी राष्ट्रांना मोडून तुकडे तुकडे करीन आणि राज्यांचा नाश करीन. [QBR]
यिर्मया 51 : 21 (IRVMR)
तुझ्याबरोबर मी घोडे आणि त्यांचे स्वार त्यांचे तुकडे तुकडे करीन, तुझ्याबरोबर मी त्यांचे रथ आणि सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन. [QBR]
यिर्मया 51 : 22 (IRVMR)
तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन. [QBR] तुझ्याबरोबर मी तरुण पुरुष आणि कुमारी मुलगी यांचे तुकडे तुकडे करीन. [QBR]
यिर्मया 51 : 23 (IRVMR)
तुझ्याबरोबर मी मेंढपाळ व त्याचे कळप यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी शेतकरी आणि त्यांच्या बैलांची जोडी यांचे तुकडे तुकडे करीन. [QBR] तुझ्याबरोबर मी राज्यकर्ते व अधिकारी यांचे तुकडे तुकडे करीन. [QBR]
यिर्मया 51 : 24 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो, मी बाबेलाला व खास्द्यांच्या देशातल्या सर्व राहणाऱ्यांनी जे अनिष्ट त्यांनी तुमच्या समक्ष [QBR] सियोनेत केले आहे त्या सर्वांचे फळ भरून देईन. [QBR]
यिर्मया 51 : 25 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो. [QBR] मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला कड्यांवरुन खाली लोटून देईन. मग बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुला करीन. [QBR]
यिर्मया 51 : 26 (IRVMR)
म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत; [QBR] कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो. [QBR]
यिर्मया 51 : 27 (IRVMR)
पृथ्वीवर निशाण उंच करा. राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. तिच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रांना नेमा. [QBR] तिच्याविरूद्ध अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना एकत्र बोलवा, [QBR] तिच्याविरूद्ध हल्ला करण्यास सेनापतीची निवड करा. विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या. [QBR]
यिर्मया 51 : 28 (IRVMR)
तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, [QBR] त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा. [QBR]
यिर्मया 51 : 29 (IRVMR)
भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे [QBR] परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत. [QBR]
यिर्मया 51 : 30 (IRVMR)
बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. [QBR] त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत. [QBR]
यिर्मया 51 : 31 (IRVMR)
बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे [QBR] हे सांगण्यासाठी एका दूतामागून दुसरा दूत आणि एक जासूद दुसऱ्या जासूदाला सांगण्यास धावत आहेत. [QBR]
यिर्मया 51 : 32 (IRVMR)
नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत [QBR] आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत. [QBR]
यिर्मया 51 : 33 (IRVMR)
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मळण्याच्या वेळी खळे जसे असते त्यासारखी बाबेलाची कन्या आहे. [QBR] तिला पायाखाली तुडवण्याची वेळ आहे. अजून थोडा अवकाश आहे, मग तिच्या कापणीचा समय येईल.” [QBR]
यिर्मया 51 : 34 (IRVMR)
यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे [QBR] आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे. [QBR]
यिर्मया 51 : 35 (IRVMR)
मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील. [QBR] “माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरूशलेम म्हणेल. [QBR]
यिर्मया 51 : 36 (IRVMR)
म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन. [QBR] कारण मी बाबेलाचे समुद्र आटवीन आणि तिचे झरे सुकवून टाकीन. [QBR]
यिर्मया 51 : 37 (IRVMR)
बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, [QBR] चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल. [QBR]
यिर्मया 51 : 38 (IRVMR)
“बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील. [QBR]
यिर्मया 51 : 39 (IRVMR)
जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी [QBR] व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो. [QBR]
यिर्मया 51 : 40 (IRVMR)
“मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन. [QBR]
यिर्मया 51 : 41 (IRVMR)
शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. [QBR] राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे. [QBR]
यिर्मया 51 : 42 (IRVMR)
बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे. [QBR]
यिर्मया 51 : 43 (IRVMR)
तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, [QBR] आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही [QBR]
यिर्मया 51 : 44 (IRVMR)
म्हणून बाबेलात मी बेलाला शिक्षा करीन; त्यांने जे गिळले आहे ते मी त्याच्या तोंडातून बाहेर आणील, [QBR] आणि राष्ट्रे त्याच्याकडे आपल्या संततीला बरोबर घेऊन वाहणार नाही. बाबेलाची भिंत पडेल. [QBR]
यिर्मया 51 : 45 (IRVMR)
माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा. [QBR]
यिर्मया 51 : 46 (IRVMR)
देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. [QBR] कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, [QBR] आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील. [QBR]
यिर्मया 51 : 47 (IRVMR)
यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील. [QBR] तेव्हा तिचा संपूर्ण देश लज्जित होईल, आणि तिचे सर्व वधलेले तिच्यामध्ये पडतील. [QBR]
यिर्मया 51 : 48 (IRVMR)
मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील. [QBR] कारण तिचा नाश करणारा उत्तरेकडून येईल.” परमेश्वर असे म्हणतो. [QBR]
यिर्मया 51 : 49 (IRVMR)
बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे, [QBR] तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील. [QBR]
यिर्मया 51 : 50 (IRVMR)
जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. [QBR] दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो. [QBR]
यिर्मया 51 : 51 (IRVMR)
“आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, [QBR] कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.” [QBR]
यिर्मया 51 : 52 (IRVMR)
यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन, [QBR] आणि तिच्या देशात जखमी झालेले कण्हतील. [QBR]
यिर्मया 51 : 53 (IRVMR)
कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, [QBR] तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो. [QBR]
यिर्मया 51 : 54 (IRVMR)
“बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो. [QBR]
यिर्मया 51 : 55 (IRVMR)
कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे. [QBR] त्यांचे शत्रू बहुत जलांच्या लाटांप्रमाणे गर्जना करीत आहेत. त्यांच्या गर्जनेचा गोंगाट फार बलवान होत आहे. [QBR]
यिर्मया 51 : 56 (IRVMR)
कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत. [QBR] त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल. [QBR]
यिर्मया 51 : 57 (IRVMR)
कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील [QBR] व ते अंत नसणाऱ्या झोपेत झोपतील आणि कधी जागे होणार नाहीत.” [QBR] असे राजाचे म्हणणे आहे; सेनाधीश परमेश्वर त्याचे नाव आहे. [QBR]
यिर्मया 51 : 58 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल, [QBR] आणि तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. मग तिच्या मदतीला येणाऱ्या लोकांची मेहनत निरुपयोगी होईल. [QBR] जी प्रत्येकगोष्ट राष्ट्र तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल ती जाळण्यात येईल.” [QBR]
यिर्मया 51 : 59 (IRVMR)
महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया [QBR] हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, [QBR] बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.
यिर्मया 51 : 60 (IRVMR)
यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती. [PE][PS]
यिर्मया 51 : 61 (IRVMR)
यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे.
यिर्मया 51 : 62 (IRVMR)
आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू स्वतः या स्थानाविषयी बोलला आहेस की, ते नष्ट होईल. मग तेथे कोणी रहिवासी किंवा लोक व पशू राहणार नाहीत. ती कायमची टाकाऊ होईल.’ [PE][PS]
यिर्मया 51 : 63 (IRVMR)
मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे.
यिर्मया 51 : 64 (IRVMR)
म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: