यिर्मया 8 : 1 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो: त्यावेळी, ते यहूदातील राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरूशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.
यिर्मया 8 : 2 (IRVMR)
आणि चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, ज्यांना ते अनुसरले आणि सेवा केली, ज्यांच्या ते मागे चालले आणि पूजन केले, त्यांच्यापुढे पसरतील, ती गोळा केल्या जाणार नाही किंवा पुरल्या जाणार नाही, ती पृथ्वीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
यिर्मया 8 : 3 (IRVMR)
आणि या दुष्ट राष्ट्रातील जे उरलेले आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना घालवले आहे, ते जिवनाच्या ऐवजी मृत्यू निवडतील, परमेश्वर असे म्हणतो.
यिर्मया 8 : 4 (IRVMR)
पाप व न्याय
यिर्मया 8 : 5 (IRVMR)
तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय? तर मग यरूशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत? ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.
यिर्मया 8 : 6 (IRVMR)
मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. कोणीही आपल्या केलेल्या वाईट कर्मांबद्दल ते क्षमा मागत नाहीत. जो असे म्हणतो, मी काय केले? असा कोणीएक नाही. तसा युद्धात घोडा धावतो तसे ते सर्व आपल्या मनात येईल तीथे जातात.
यिर्मया 8 : 7 (IRVMR)
आकाशातील करकोचीसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे पण माझ्या लोकांस, परमेश्वराचे वचन माहीत नाही.
यिर्मया 8 : 8 (IRVMR)
आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत! असे तुम्ही म्हणता? कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे.
यिर्मया 8 : 9 (IRVMR)
शहाणे लाजवले गेले आहेत, ते निराशेत आहेत आणि पकडले गेले आहेत. पाहा, त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा, जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले?
यिर्मया 8 : 10 (IRVMR)
म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजकापर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.
यिर्मया 8 : 11 (IRVMR)
काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे.
यिर्मया 8 : 12 (IRVMR)
त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील, असे परमेश्वर म्हणतो.
यिर्मया 8 : 13 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो, मी त्यांना पुर्णपणे काढून टाकीन, द्राक्षवेलीवंर एकही द्राक्ष नसेल, आणि अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल, पाने सुकतील आणि जे काही त्यांना दिले आहे, ते त्यांच्यापासून निघून जाईल.
यिर्मया 8 : 14 (IRVMR)
आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या आणि आम्ही मृत्यूमध्ये तिथे गप्प बसू परमेश्वर आमचा देव याने आम्हास गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुध्द पाप केले आहे, म्हणून त्याने आम्हांला विषारी पाणी प्यायला दिले आहे.
यिर्मया 8 : 15 (IRVMR)
आम्ही शांतीची आशा केली पण आम्हांला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हास क्षमा करील असे आम्हास वाटले, पण पाहा! अरिष्टच आले.
यिर्मया 8 : 16 (IRVMR)
त्यांच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्याच्या शक्तीशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पुर्ण पृथ्वी थरथरली आहे. कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस नाश करण्यासाठी आले आहेत.
यिर्मया 8 : 17 (IRVMR)
कारण पाहा! मी नाग आणि फुरशे तुमच्यामध्ये पाठवीन. त्यांना आवरणे अशक्य आहे, ते तुम्हास दंश करतील. परमेश्वर असे म्हणतो.
यिर्मया 8 : 18 (IRVMR)
यहूदा व यरूशलेमसाठी शोक माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.
यिर्मया 8 : 19 (IRVMR)
पाहा! माझ्या लोकांच्या कन्येचा रडण्याचा आवाज फार दूर असलेल्या देशातून येतो. “परमेश्वर सियोनात नाही काय? किंवा तिचा राजा तिच्यामध्ये नाही काय?” मग त्यांनी आपल्या कोरलेल्या प्रतिमांनी आणि निरुपयोगी मूर्तींनी मला का क्रोध आणला आहे.
यिर्मया 8 : 20 (IRVMR)
“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.”
यिर्मया 8 : 21 (IRVMR)
माझ्या लोकांच्या कन्येच्या जखमेमुळे मी जखमी झालो आहे. तिच्या सोबत घडलेल्या भयानक गोष्टींमुळे मी शोकात आणि निराशेत आहे.
यिर्मया 8 : 22 (IRVMR)
गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22