यिर्मया 9 : 1 (IRVMR)
जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते [QBR] तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते. [QBR]
यिर्मया 9 : 2 (IRVMR)
जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, [QBR] कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत. [QBR]
यिर्मया 9 : 3 (IRVMR)
कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. [QBR] ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो. [QBR]
यिर्मया 9 : 4 (IRVMR)
तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका? [QBR] कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे. [QBR]
यिर्मया 9 : 5 (IRVMR)
प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. [QBR] त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात. [QBR]
यिर्मया 9 : 6 (IRVMR)
तू आपल्या कपटामध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात, असे परमेश्वर म्हणतो. [QBR]
यिर्मया 9 : 7 (IRVMR)
यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी त्यांची परिक्षा घेईल आणि त्यांना तपासून पाहीन. [QBR] कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरिता आणखी काय करू? [QBR]
यिर्मया 9 : 8 (IRVMR)
त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. [QBR] प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात. [QBR]
यिर्मया 9 : 9 (IRVMR)
या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो. [QBR]
यिर्मया 9 : 10 (IRVMR)
मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. [QBR] कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. [QBR] आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत. [QBR]
यिर्मया 9 : 11 (IRVMR)
म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. [QBR] मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”
यिर्मया 9 : 12 (IRVMR)
{नाश व हद्दपार होण्याचे भय} [PS] या गोष्टी समजण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषीत केले, म्हणजे ते तो कळवू शकेल काय? [QBR] या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली. [QBR]
यिर्मया 9 : 13 (IRVMR)
परमेश्वर म्हणाला, “हे असे झाले कारण, त्यांनी माझ्या शिकवणुकीला सोडून दिले, जे मी त्यांच्या समोर ठेवली होती, आणि त्यांनी माझी वाणी ऐकाण्यास आणि त्यावर चालण्यास नकार दिला. [QBR]
यिर्मया 9 : 14 (IRVMR)
हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.” [QBR]
यिर्मया 9 : 15 (IRVMR)
यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांस कडू दवणा खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन. [QBR]
यिर्मया 9 : 16 (IRVMR)
नंतर मी त्यांना आशा राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. आणि मी सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन.” [QBR]
यिर्मया 9 : 17 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. [QBR] प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या. [QBR]
यिर्मया 9 : 18 (IRVMR)
त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करवा. [QBR] म्हणजे आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल. [QBR]
यिर्मया 9 : 19 (IRVMR)
सियोनमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडून टाकली आहेत.” [QBR]
यिर्मया 9 : 20 (IRVMR)
तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. [QBR] नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा. [QBR]
यिर्मया 9 : 21 (IRVMR)
कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे. [QBR]
यिर्मया 9 : 22 (IRVMR)
असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत. {देवाचे ज्ञान-मानवाचे वैभव}
यिर्मया 9 : 23 (IRVMR)
परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी [QBR] त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.” [QBR]
यिर्मया 9 : 24 (IRVMR)
पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो, [QBR] कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो. [QBR]
यिर्मया 9 : 25 (IRVMR)
परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत. [QBR]
यिर्मया 9 : 26 (IRVMR)
मिसर, यहूदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणारे, ज्यांनी आपल्या डोक्यावरचे केस कापले त्यांना शासन करीन. कारण ही सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत, आणि इस्राएलाचे सर्व घराणे बेसुनत हृदयाचे आहेत. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: