योहान 13 : 1 (IRVMR)
{#1येशू शिष्यांचे पाय धुतो } [PS]आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
योहान 13 : 2 (IRVMR)
शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते.
योहान 13 : 3 (IRVMR)
येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
योहान 13 : 4 (IRVMR)
येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला.
योहान 13 : 5 (IRVMR)
त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.
योहान 13 : 6 (IRVMR)
मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?”
योहान 13 : 7 (IRVMR)
येशूने त्यास उत्तर दिले, [SCJ]“मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.”[SCJ.]
योहान 13 : 8 (IRVMR)
पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, [SCJ]“मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”[SCJ.]
योहान 13 : 9 (IRVMR)
शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.”
योहान 13 : 10 (IRVMR)
येशूने त्यास म्हटले, [SCJ]“ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.”[SCJ.]
योहान 13 : 11 (IRVMR)
कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, [SCJ]“तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”[SCJ.] [PE]
योहान 13 : 12 (IRVMR)
[PS]मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, [SCJ]“मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय?[SCJ.]
योहान 13 : 13 (IRVMR)
[SCJ]तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.[SCJ.]
योहान 13 : 14 (IRVMR)
[SCJ]मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत.[SCJ.]
योहान 13 : 15 (IRVMR)
[SCJ]कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे.[SCJ.]
योहान 13 : 16 (IRVMR)
[SCJ]मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही.[SCJ.]
योहान 13 : 17 (IRVMR)
[SCJ]या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.[SCJ.]
योहान 13 : 18 (IRVMR)
[SCJ]मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.[SCJ.]
योहान 13 : 19 (IRVMR)
[SCJ]आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.[SCJ.]
योहान 13 : 20 (IRVMR)
[SCJ]मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”[SCJ.] [PE]
योहान 13 : 21 (IRVMR)
[PS]असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, [SCJ]“मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.”[SCJ.]
योहान 13 : 22 (IRVMR)
तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
योहान 13 : 23 (IRVMR)
तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता.
योहान 13 : 24 (IRVMR)
म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले.
योहान 13 : 25 (IRVMR)
तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”
योहान 13 : 26 (IRVMR)
येशूने उत्तर दिले, [SCJ]“मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.”[SCJ.] आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला.
योहान 13 : 27 (IRVMR)
आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, [SCJ]“तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”[SCJ.]
योहान 13 : 28 (IRVMR)
पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.
योहान 13 : 29 (IRVMR)
कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे, असे कित्येकांस वाटले.
योहान 13 : 30 (IRVMR)
मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती. [PE]
योहान 13 : 31 (IRVMR)
[PS]तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, [SCJ]“आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे;[SCJ.]
योहान 13 : 32 (IRVMR)
[SCJ]देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.[SCJ.]
योहान 13 : 33 (IRVMR)
[SCJ]मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहूदी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘मी जाईन तिकडे तुम्हास येता येणार नाही.’ तसे तुम्हासही आता सांगतो.[SCJ.]
योहान 13 : 34 (IRVMR)
[SCJ]मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.[SCJ.]
योहान 13 : 35 (IRVMR)
[SCJ]तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”[SCJ.] [PE]
योहान 13 : 36 (IRVMR)
[PS]शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, [SCJ]“मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”[SCJ.]
योहान 13 : 37 (IRVMR)
पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”
योहान 13 : 38 (IRVMR)
येशूने त्यास उत्तर दिले, [SCJ]“माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”[SCJ.] [PE]
❮
❯