योहान 9 : 1 (IRVMR)
{जन्मांधळ्याला दृष्टी देणे} [PS] तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला.
योहान 9 : 2 (IRVMR)
तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, “रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?”
योहान 9 : 3 (IRVMR)
येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.
योहान 9 : 4 (IRVMR)
ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
योहान 9 : 5 (IRVMR)
मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
योहान 9 : 6 (IRVMR)
असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला.
योहान 9 : 7 (IRVMR)
आणि त्यास म्हटले, “जा, शिलोहाच्या तळ्यात धू.” (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.
योहान 9 : 8 (IRVMR)
म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्यास भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, “तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?”
योहान 9 : 9 (IRVMR)
कोणी म्हणाले, “हा तो आहे.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे.” पण तो म्हणाला, “मी तोच आहे.”
योहान 9 : 10 (IRVMR)
म्हणून ते त्यास म्हणाले, “मग तुझे डोळे कसे उघडले?”
योहान 9 : 11 (IRVMR)
त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहवर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”
योहान 9 : 12 (IRVMR)
तेव्हा त्यांनी म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला माहीत नाही.” [PE][PS]
योहान 9 : 13 (IRVMR)
तो जो पूर्वी आंधळा होता त्यास त्यांनी परूश्यांकडे नेले,
योहान 9 : 14 (IRVMR)
ज्यादिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.
योहान 9 : 15 (IRVMR)
म्हणून परूश्यांनीही त्यास पुन्हा विचारले. “तुला कसे दिसू लागले?” आणि तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला, तो मी धुऊन टाकल्यावर, मला दिसू लागले.”
योहान 9 : 16 (IRVMR)
तेव्हा परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” पण दुसरे म्हणाले, “जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हे कशी करू शकतो?”
योहान 9 : 17 (IRVMR)
म्हणून, पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने जर तुझे डोळे उघडले तर तू त्याच्याविषयी काय म्हणतोस?” तो म्हणाला, “तो एक संदेष्टा आहे.” [PE][PS]
योहान 9 : 18 (IRVMR)
म्हणून यहूदी अधिकाऱ्यांनी ज्याला दृष्टी आली होती त्याच्याविषयी त्याच्या आई-वडीलांना बोलवून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून व आता डोळस झाला आहे, यावर विश्वास ठेवला नाही. [PE][PS]
योहान 9 : 19 (IRVMR)
त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्यास कसे दिसते?”
योहान 9 : 20 (IRVMR)
त्याच्या आई-वडीलानी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे; आणि हा आंधळा जन्मला होता हे आम्हास माहीत आहे.
योहान 9 : 21 (IRVMR)
तरी आता त्यास कसे दिसू लागले हे आम्हास माहीत नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास माहीत नाही. त्यास विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”
योहान 9 : 22 (IRVMR)
त्याच्या आई-वडीलांना यहूदी अधिकाऱ्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण, तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्यास सभास्थानातून घालवावे, असे यहुद्यांचे आधीच एकमत झाले होते.
योहान 9 : 23 (IRVMR)
यामुळे त्याच्या आई-वडीलानी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्यास विचारा.” [PE][PS]
योहान 9 : 24 (IRVMR)
तेव्हा जो मनुष्य आंधळा होता त्यास त्यांनी दुसर्‍यांदा बोलावले आणि ते त्यास म्हणाले, “देवाचे गौरव कर; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”
योहान 9 : 25 (IRVMR)
यावरुन त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मी जाणत नाही. मी एक गोष्ट जाणतो; मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”
योहान 9 : 26 (IRVMR)
म्हणून ते त्यास म्हणाले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”
योहान 9 : 27 (IRVMR)
त्याने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास आताच सांगितले, तरी तुम्ही ऐकले नाही; ते पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहता काय?”
योहान 9 : 28 (IRVMR)
तेव्हा त्यांनी त्याची निंदा करून आणि ते त्यास म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत.
योहान 9 : 29 (IRVMR)
देव मोशेबरोबर बोलला हे आम्हास माहीत आहे. हा कोठला आहे हे आम्हास माहीत नाही.”
योहान 9 : 30 (IRVMR)
त्या मनुष्याने त्यांना उत्तर दिले “हेच तर मोठे आश्चर्य आहे की, हा कोठला आहे हे तुम्हास माहीत नाही; आणि तरी त्याने माझे डोळे उघडले.
योहान 9 : 31 (IRVMR)
आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.
योहान 9 : 32 (IRVMR)
आंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते.
योहान 9 : 33 (IRVMR)
हा जर देवापासून नसता तर याला काही करता आले नसते.”
योहान 9 : 34 (IRVMR)
त्यांनी त्यास म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि तू आम्हास शिकवतोस काय?” आणि त्यांनी त्यास बाहेर घालवले. [PE][PS]
योहान 9 : 35 (IRVMR)
त्यांनी त्यास बाहेर घालवले हे येशूने ऐकले; आणि त्यास तो सापडल्यावर तो त्यास म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
योहान 9 : 36 (IRVMR)
त्याने उत्तर दिले, “साहेब, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”
योहान 9 : 37 (IRVMR)
येशूने त्यास म्हटले, “तू त्यास पाहिले आहे आणि तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”
योहान 9 : 38 (IRVMR)
तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो.” आणि त्याने त्यास नमन केले.
योहान 9 : 39 (IRVMR)
तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो आहे; यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”
योहान 9 : 40 (IRVMR)
तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्यास म्हणाले, “आम्ही पण आंधळे आहोत काय?”
योहान 9 : 41 (IRVMR)
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हास पाप नसते, परंतु तुम्ही म्हणता की, ‘आम्हास आता दिसते’, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: