यहोशवा 12 : 1 (IRVMR)
मोशेने पराभूत केलेले राजे
गण. 21:21-35
यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत:
यहोशवा 12 : 2 (IRVMR)
अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.
यहोशवा 12 : 3 (IRVMR)
किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, अराब समुद्राच्या * क्षार किंवा मृत समुद्र पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.
यहोशवा 12 : 4 (IRVMR)
बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता.
यहोशवा 12 : 5 (IRVMR)
तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूरी सीमेपर्यंत आणि माकाथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे.
यहोशवा 12 : 6 (IRVMR)
परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली.
यहोशवा 12 : 7 (IRVMR)
यहोशवाने पराभूत केलेले राजे यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,
यहोशवा 12 : 8 (IRVMR)
डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.
यहोशवा 12 : 9 (IRVMR)
या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेलशेजारी असलेल्या आयचा राजा,
यहोशवा 12 : 10 (IRVMR)
यरूशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा,
यहोशवा 12 : 11 (IRVMR)
यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा
यहोशवा 12 : 12 (IRVMR)
एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
यहोशवा 12 : 13 (IRVMR)
दबीरचा राजा, बेथ-गेदेरचा राजा,
यहोशवा 12 : 14 (IRVMR)
हर्माचा राजा, अरादचा राजा,
यहोशवा 12 : 15 (IRVMR)
लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.
यहोशवा 12 : 16 (IRVMR)
मक्केदाचा राजा बेथेलचा राजा,
यहोशवा 12 : 17 (IRVMR)
तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा,
यहोशवा 12 : 18 (IRVMR)
अफेकाचा राजा, शारोनचा राजा,
यहोशवा 12 : 19 (IRVMR)
मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
यहोशवा 12 : 20 (IRVMR)
शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा,
यहोशवा 12 : 21 (IRVMR)
तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
यहोशवा 12 : 22 (IRVMR)
केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा,
यहोशवा 12 : 23 (IRVMR)
नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा,
यहोशवा 12 : 24 (IRVMR)
तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24