यहोशवा 15 : 1 (IRVMR)
यहूदाला देण्यात आलेला प्रदेश यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
यहोशवा 15 : 2 (IRVMR)
आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
यहोशवा 15 : 3 (IRVMR)
ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.
यहोशवा 15 : 4 (IRVMR)
आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
यहोशवा 15 : 5 (IRVMR)
आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
यहोशवा 15 : 6 (IRVMR)
मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
यहोशवा 15 : 7 (IRVMR)
मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
यहोशवा 15 : 8 (IRVMR)
मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
यहोशवा 15 : 9 (IRVMR)
मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
यहोशवा 15 : 10 (IRVMR)
मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.
यहोशवा 15 : 11 (IRVMR)
मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.
यहोशवा 15 : 12 (IRVMR)
आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
यहोशवा 15 : 13 (IRVMR)
कालेब हा हेब्रोन व दबीर ही नगरे हस्तगत करतो
शास्ते 1:11-15
आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
यहोशवा 15 : 14 (IRVMR)
मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
यहोशवा 15 : 15 (IRVMR)
नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
यहोशवा 15 : 16 (IRVMR)
तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.
यहोशवा 15 : 17 (IRVMR)
तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”
यहोशवा 15 : 18 (IRVMR)
आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
यहोशवा 15 : 19 (IRVMR)
अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
यहोशवा 15 : 20 (IRVMR)
यहूदाला मिळालेली नगरे यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
यहोशवा 15 : 21 (IRVMR)
यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
यहोशवा 15 : 22 (IRVMR)
कीना व दीमोना व अदादा;
यहोशवा 15 : 23 (IRVMR)
आणि केदेश व हासोर व इथनान;
यहोशवा 15 : 24 (IRVMR)
जीफ, टेलेम व बालोथ;
यहोशवा 15 : 25 (IRVMR)
हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)
यहोशवा 15 : 26 (IRVMR)
अमाम व शमा व मोलादा;
यहोशवा 15 : 27 (IRVMR)
आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;
यहोशवा 15 : 28 (IRVMR)
आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
यहोशवा 15 : 29 (IRVMR)
बाला, ईयीम व असेम;
यहोशवा 15 : 30 (IRVMR)
आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
यहोशवा 15 : 31 (IRVMR)
आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
यहोशवा 15 : 32 (IRVMR)
आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
यहोशवा 15 : 33 (IRVMR)
तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
यहोशवा 15 : 34 (IRVMR)
जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
यहोशवा 15 : 35 (IRVMR)
यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
यहोशवा 15 : 36 (IRVMR)
आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
यहोशवा 15 : 37 (IRVMR)
सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
यहोशवा 15 : 38 (IRVMR)
दिलन, मिस्पा व यकथेल;
यहोशवा 15 : 39 (IRVMR)
लाखीश व बसकाथ व एग्लोन;
यहोशवा 15 : 40 (IRVMR)
कब्बोन व लहमाम व किथलीश;
यहोशवा 15 : 41 (IRVMR)
गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
यहोशवा 15 : 42 (IRVMR)
लिब्ना व एथेर व आशान;
यहोशवा 15 : 43 (IRVMR)
इफ्ताह व अष्णा व नजीब;
यहोशवा 15 : 44 (IRVMR)
आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
यहोशवा 15 : 45 (IRVMR)
एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
यहोशवा 15 : 46 (IRVMR)
एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
यहोशवा 15 : 47 (IRVMR)
अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
यहोशवा 15 : 48 (IRVMR)
आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
यहोशवा 15 : 49 (IRVMR)
दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
यहोशवा 15 : 50 (IRVMR)
अनाब व एष्टमो व अनीम,
यहोशवा 15 : 51 (IRVMR)
आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
यहोशवा 15 : 52 (IRVMR)
अरब व दूमा व एशान,
यहोशवा 15 : 53 (IRVMR)
यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
यहोशवा 15 : 54 (IRVMR)
हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
यहोशवा 15 : 55 (IRVMR)
मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
यहोशवा 15 : 56 (IRVMR)
इज्रेल व यकदाम व जानोहा,
यहोशवा 15 : 57 (IRVMR)
काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
यहोशवा 15 : 58 (IRVMR)
हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
यहोशवा 15 : 59 (IRVMR)
माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
यहोशवा 15 : 60 (IRVMR)
किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
यहोशवा 15 : 61 (IRVMR)
रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
यहोशवा 15 : 62 (IRVMR)
आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
यहोशवा 15 : 63 (IRVMR)
तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63