यहोशवा 19 : 1 (IRVMR)
शिमोनाला देण्यात आलेला प्रदेश दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.
यहोशवा 19 : 2 (IRVMR)
आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;
यहोशवा 19 : 5 (IRVMR)
आणि सिकलाग व बेथ-मर्का-बोथ व हसर-सूसा;
यहोशवा 19 : 6 (IRVMR)
आणि बेथ-लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गावे;
यहोशवा 19 : 7 (IRVMR)
अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गावे;
यहोशवा 19 : 8 (IRVMR)
बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.
यहोशवा 19 : 9 (IRVMR)
शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले.
यहोशवा 19 : 10 (IRVMR)
जबुलूनाला देण्यात आलेला प्रदेश तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;
यहोशवा 19 : 11 (IRVMR)
त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.
यहोशवा 19 : 12 (IRVMR)
ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते.
यहोशवा 19 : 13 (IRVMR)
तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते;
यहोशवा 19 : 14 (IRVMR)
ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.
यहोशवा 19 : 15 (IRVMR)
कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत.
यहोशवा 19 : 16 (IRVMR)
जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
यहोशवा 19 : 17 (IRVMR)
इस्साखाराला देण्यात आलेला प्रदेश इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली.
यहोशवा 19 : 18 (IRVMR)
त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;
यहोशवा 19 : 19 (IRVMR)
आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;
यहोशवा 19 : 21 (IRVMR)
रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस,
यहोशवा 19 : 22 (IRVMR)
त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे.
यहोशवा 19 : 23 (IRVMR)
इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
यहोशवा 19 : 24 (IRVMR)
आशेराला देण्यात आलेला प्रदेश पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
यहोशवा 19 : 25 (IRVMR)
त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;
यहोशवा 19 : 26 (IRVMR)
अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
यहोशवा 19 : 27 (IRVMR)
ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.
यहोशवा 19 : 28 (IRVMR)
तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.
यहोशवा 19 : 29 (IRVMR)
तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.
यहोशवा 19 : 30 (IRVMR)
उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;
यहोशवा 19 : 31 (IRVMR)
आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
यहोशवा 19 : 32 (IRVMR)
नफतालीला देण्यात आलेला प्रदेश सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
यहोशवा 19 : 33 (IRVMR)
त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.
यहोशवा 19 : 34 (IRVMR)
तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.
यहोशवा 19 : 35 (IRVMR)
त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;
यहोशवा 19 : 38 (IRVMR)
इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे.
यहोशवा 19 : 39 (IRVMR)
नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.
यहोशवा 19 : 40 (IRVMR)
दानाला देण्यात आलेला प्रदेश सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.
यहोशवा 19 : 41 (IRVMR)
त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.
यहोशवा 19 : 42 (IRVMR)
शालब्बीन व अयालोन व इथला;
यहोशवा 19 : 45 (IRVMR)
यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन.
यहोशवा 19 : 46 (IRVMR)
मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.
यहोशवा 19 : 47 (IRVMR)
दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरही गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले; आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले.
यहोशवा 19 : 48 (IRVMR)
दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे.
यहोशवा 19 : 49 (IRVMR)
यहोशवाला देण्यात आलेला प्रदेश इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले.
यहोशवा 19 : 50 (IRVMR)
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला.
यहोशवा 19 : 51 (IRVMR)
एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51