यहोशवा 3 : 1 (IRVMR)
इस्त्राएल लोक यार्देन नदी ओलांडतात
यहोशवा 3 : 2 (IRVMR)
यहोशवा पहाटेस ऊठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून निघून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी ते तेथे राहिले. तीन दिवसानंतर पुढारी छावणीच्या मध्य भागामधून गेले.
यहोशवा 3 : 3 (IRVMR)
व त्यांनी लोकांस अशी आज्ञा केली की, “आमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश याजक ऊचलून घेऊन जात असताना तुम्ही पाहाल तेव्हा हे ठिकाण सोडून त्यांच्या पाठोपाठ जा;
यहोशवा 3 : 4 (IRVMR)
पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात* सुमारे 1 किलोमीटर अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.”
यहोशवा 3 : 5 (IRVMR)
मग यहोशवा लोकांस म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे.”
यहोशवा 3 : 6 (IRVMR)
नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला,” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले.
यहोशवा 3 : 7 (IRVMR)
परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल.
यहोशवा 3 : 8 (IRVMR)
कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.”
यहोशवा 3 : 9 (IRVMR)
मग यहोशवा इस्राएल लोकांस म्हणाला, “इकडे या! आणि देव परमेश्वर याची वचने ऐका!
यहोशवा 3 : 10 (IRVMR)
अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल.
यहोशवा 3 : 11 (IRVMR)
संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे.
यहोशवा 3 : 12 (IRVMR)
तर आता प्रत्येक वंशातील एक मनुष्य, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा;
यहोशवा 3 : 13 (IRVMR)
संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांच्या पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.”
यहोशवा 3 : 14 (IRVMR)
लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले.
यहोशवा 3 : 15 (IRVMR)
कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.)
यहोशवा 3 : 16 (IRVMR)
तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
यहोशवा 3 : 17 (IRVMR)
परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17