शास्ते 17 : 1 (IRVMR)
मीखाने केलेली मूर्तीपूजा एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात एक मनुष्य होता; त्याचे नाव मीखा.
शास्ते 17 : 2 (IRVMR)
आणि त्याने आपल्या आईला म्हटले, “जी अकराशे शेकेल* साधारण 13 किलोग्राम रुप्याची नाणी तुझ्याजवळून घेतली गेली होती,” आणि ज्यामुळे तू शाप उच्चारला होता, आणि तो मी ऐकला! पाहा ती रुप्याची नाणी माझ्याजवळ आहेत; मीच ती चोरून घेतली होती. त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो!”
शास्ते 17 : 3 (IRVMR)
मग त्याने ती अकराशे शेकेल रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिली; तेव्हा त्याच्या आईने म्हटले, “मी माझ्या मुलासाठी कोरीव लाकडी मूर्ती व ओतीव धातूची मूर्ती करण्यासाठी आपल्या हाताने हे रुपे परमेश्वरास अर्पण म्हणून वेगळी करते. तर आता मी ही तुला परत देते.”
शास्ते 17 : 4 (IRVMR)
त्याने ती रुप्याची नाणी आपल्या आईला परत दिल्यावर त्याच्या आईने दोनशे शेकेल रुपे घेऊन ते सोनाराला दिले, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ती केली. नंतर ती मीखाच्या घरी ठेवली.
शास्ते 17 : 5 (IRVMR)
मीखा या मनुष्याचे एक मूर्तीचे देवघर होते, आणि त्याने याजकाचे एफोद व कुलदेवता केल्या होत्या; आणखी त्याने आपल्या एका मुलाचे याजक म्हणून समर्पण केले होते.
शास्ते 17 : 6 (IRVMR)
त्या दिवसात इस्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येकाने आपापल्या दिसण्यात जे योग्य, ते केले.
शास्ते 17 : 7 (IRVMR)
तेव्हा यहूदातील बेथलेहेमातला यहूदी घराण्यातला तरुण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता.
शास्ते 17 : 8 (IRVMR)
नंतर तो मनुष्य यहूदातल्या बेथलेहेम नगरातून निघाला, आपल्याला राहण्यास कोठे जागा मिळेल ते शोधू लागला. प्रवास करत तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आला.
शास्ते 17 : 9 (IRVMR)
मग मीखा त्यास म्हणाला, “तू कोठून आलास?” तेव्हा तो मनुष्य त्यास म्हणाला, “मी बेथलेहेमातला यहूदी लेवी आहे; आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे.”
शास्ते 17 : 10 (IRVMR)
तेव्हा मीखा त्यास म्हणाला, “तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा रुप्याची नाणी साधारण 115 ग्राम व एक पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला.”
शास्ते 17 : 11 (IRVMR)
तो लेवी त्या मनुष्याबरोबर राहायला तयार झाला, आणि तो तरुण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला.
शास्ते 17 : 12 (IRVMR)
आणि मीखाने त्या लेवीला पवित्र कर्तव्य करण्यास वेगळे केले, आणि तो तरुण त्याचा याजक झाला आणि तो मीखाच्या घरी राहिला.
शास्ते 17 : 13 (IRVMR)
नंतर मीखा बोलला, “आता मला कळले की, परमेश्वर माझे चांगले करील, कारण हा लेवी माझा याजक झाला आहे.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13