शास्ते 8 : 1 (IRVMR)
तेव्हा एफ्राइमी माणसे गिदोनाला म्हणाली, “तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावयाला गेलास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले.
शास्ते 8 : 2 (IRVMR)
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की, त्याची तुलना तुमच्याशी करावी? एफ्राईमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबीयेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय?
शास्ते 8 : 3 (IRVMR)
मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.
शास्ते 8 : 4 (IRVMR)
गिदोन मिद्यानाचे राजे कैद करतो गिदोन व त्याच्याबरोबर जी तीनशे माणसे होती, ती यार्देन ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला.
शास्ते 8 : 5 (IRVMR)
तेव्हा तो सुक्कोथातल्या मनुष्यांना म्हणाला, “माझ्याबरोबरच्या लोकांस तुम्ही कृपा करून भाकरी द्या; कारण ते दमलेले आहेत, आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे.”
शास्ते 8 : 6 (IRVMR)
तेव्हा सुक्कोथाचे अधिकारी म्हणाले, काय, जेबह व सलमुन्ना यांच्यावर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हास माहीत नाही आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी?
शास्ते 8 : 7 (IRVMR)
तेव्हा गिदोन म्हणाला, “जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना ह्यांच्यावर मला विजय देईल, तेव्हा मी रानातल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन.”
शास्ते 8 : 8 (IRVMR)
नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याच प्रकारे बोलला, परंतु जसे सुक्कोथातल्या मनुष्यांनी उत्तर दिले होते, तसेच पनुएलातल्या मनुष्यांनी त्यास उत्तर दिले.
शास्ते 8 : 9 (IRVMR)
तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, “जेव्हा मी शांतीने माघारी येईन, तेव्हा मी हा बुरूज खाली ओढून टाकीन.”
शास्ते 8 : 10 (IRVMR)
तेव्हा जेबाह व सलमुन्ना कर्कोरात होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते; पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले होते ते सर्व पंधरा हजार होते; त्यांच्यातले जे लढणारे एक लाख वीस हजार पुरुष तलवारीने पडले होते.
शास्ते 8 : 11 (IRVMR)
तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.
शास्ते 8 : 12 (IRVMR)
जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाच्या ह्या दोन राजांना पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.
शास्ते 8 : 13 (IRVMR)
मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला.
शास्ते 8 : 14 (IRVMR)
तेव्हा त्याने सुक्कोथातला एक तरुण मनुष्य धरला, आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण मनुष्याने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा सत्याहत्तर मनुष्यांचे वर्णन लिहून दिले.
शास्ते 8 : 15 (IRVMR)
मग तो सुक्कोथातल्या मनुष्यांजवळ जाऊन बोलला, “हे पाहा, जेबाह व सलमुन्ना! याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला, काय, जबाह व सलमुन्ना यांना आधीच जिंकले आहेस काय? आम्हास माहीत नाही तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी?”
शास्ते 8 : 16 (IRVMR)
नंतर त्याने त्या नगराच्या वडीलांना धरले, आणि रानातल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या मनुष्यांना शिक्षा केली
शास्ते 8 : 17 (IRVMR)
आणि त्याने पनुएलाचा बुरूज खाली ओढून टाकला, त्या नगरातल्या मनुष्यांना मारून टाकले.
शास्ते 8 : 18 (IRVMR)
मग जेबह व सलमुन्ना यांस तो म्हणाला, “जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती?” तेव्हा ते बोलले, “जसा तू आहेस तशीच ती होती; त्यातला प्रत्येकजण राजाच्या पुत्रासारखा होता.”
शास्ते 8 : 19 (IRVMR)
गिदोन म्हणाला, “ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते, तर परमेश्वराशपथ मी तुम्हाला मारले नसते.”
शास्ते 8 : 20 (IRVMR)
तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, “तू उठून त्यांना मार. परंतु त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता,” म्हणून तो घाबरला.
शास्ते 8 : 21 (IRVMR)
तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हांला मार, कारण जसा पुरुष, तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांना मारले, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले.
शास्ते 8 : 22 (IRVMR)
गिदोनाची इतर कृत्ये आणि त्याचा मृत्यू तेव्हा इस्राएलातल्या मनुष्यांनी गिदोनाला म्हटले, “तू, तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने आमच्यावर राज्य करावे, कारण तू आम्हास मिद्यानाच्या तावडीतून सोडवले आहे.”
शास्ते 8 : 23 (IRVMR)
तेव्हा गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्यावर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही, तर परमेश्वर तुमच्यावर राज्य करील.”
शास्ते 8 : 24 (IRVMR)
तरी गिदोन त्यांना बोलला, “मी तुमच्याजवळ एक मागणे करीन की तुम्ही एकएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे.” त्यामध्ये तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्माएली लोक होते.
शास्ते 8 : 25 (IRVMR)
तेव्हा ते बोलले, “आम्ही देतोच देतो.” मग त्यांनी वस्त्र पसरले, आणि त्यातल्या एकएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली.
शास्ते 8 : 26 (IRVMR)
आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने एक हजार सातशे शेकेल वजनाचे होते; चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यानी राजांची जांभळी वस्रे यांखेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज ते होते.
शास्ते 8 : 27 (IRVMR)
तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले, आणि आपले नगर अफ्रा यामध्ये ते ठेवले, मग सर्व इस्राएलानी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला; असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले.
शास्ते 8 : 28 (IRVMR)
मिद्यानांचा तर इस्राएलाच्या लोकांपुढे मोड झाला, आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही; असे गिदोनाच्या दिवसात देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला.
शास्ते 8 : 29 (IRVMR)
योवाशाचा पुत्र यरूब्बाल * गिदोन तर आपल्या घरी जाऊन राहिला.
शास्ते 8 : 30 (IRVMR)
आणि गिदोनाला सत्तर पुत्र झाले; कारण त्यास पुष्कळ पत्नी होत्या.
शास्ते 8 : 31 (IRVMR)
आणि शखेमात जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्यास पुत्र झाला, आणि त्याने त्याचे नाव अबीमलेख ठेवले.
शास्ते 8 : 32 (IRVMR)
मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला, आणि त्यास अबीयेजऱ्यांच्या अफ्रा येथे त्याचा पिता योवाश याच्या कबरेत पुरण्यात आले.
शास्ते 8 : 33 (IRVMR)
तेव्हा असे झाले की, गिदोन मरण पावल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बआल-बरीथ ह्याला आपला देव केले.
शास्ते 8 : 34 (IRVMR)
असे इस्राएलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही.
शास्ते 8 : 35 (IRVMR)
आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्राएलावर जे अवघे उपकार केले होते, त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35