लेवीय 12 : 1 (IRVMR)
{प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी नियम} [PS] परमेश्वर मोशेला म्हणाला,
लेवीय 12 : 2 (IRVMR)
इस्राएल लोकांस सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध रहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी.
लेवीय 12 : 3 (IRVMR)
आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. [PE][PS]
लेवीय 12 : 4 (IRVMR)
नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तुला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.
लेवीय 12 : 5 (IRVMR)
परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध रहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील. [PE][PS]
लेवीय 12 : 6 (IRVMR)
तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची वेळ पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत. [PE][PS]
लेवीय 12 : 7 (IRVMR)
मग याजकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.
लेवीय 12 : 8 (IRVMR)
तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी मग याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती शुद्ध होईल. [PE]

1 2 3 4 5 6 7 8

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: