लेवीय 5 : 1 (IRVMR)
[PS]जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;
लेवीय 5 : 2 (IRVMR)
किंवा कोणी अशुद्ध वस्तुला किंवा मरण पावलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. [PE]
लेवीय 5 : 3 (IRVMR)
[PS]त्याचप्रमाणे मनुष्याशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तुला नकळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल[* वचन 12-14 वाचा ].
लेवीय 5 : 4 (IRVMR)
किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल. [PE]
लेवीय 5 : 5 (IRVMR)
[PS]तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
लेवीय 5 : 6 (IRVMR)
आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे. [PE]
लेवीय 5 : 7 (IRVMR)
[PS]त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.
लेवीय 5 : 8 (IRVMR)
त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये
लेवीय 5 : 9 (IRVMR)
पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरु द्यावे; हे पापार्पण होय. [PE]
लेवीय 5 : 10 (IRVMR)
लेवीय 5 : 11 (IRVMR)
[PS]मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; म्हणजे त्याची क्षमा होईल. [PE]
लेवीय 5 : 12 (IRVMR)
[PS]“जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग [† साधारण एक किलोग्राम ]सपिठ पापार्पण म्हणून आणावे; त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय. [PE][PS]त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगूलपणा करिता होम करावा; हे पापार्पण होय.
लेवीय 5 : 13 (IRVMR)
अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपिठ याजकाचे होईल.” [PE]
लेवीय 5 : 14 (IRVMR)
{#1दोषार्पणे } [PS]नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
लेवीय 5 : 15 (IRVMR)
“परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा, हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमाणे असावे; हे दोषार्पण होय. [PE]
लेवीय 5 : 16 (IRVMR)
लेवीय 5 : 17 (IRVMR)
[PS]ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल. [PE][PS]परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा नकळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
लेवीय 5 : 18 (IRVMR)
त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा; हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा तो असावा अशाप्रकारे याजकाने त्या मनुष्याकडून नकळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
लेवीय 5 : 19 (IRVMR)
हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: