लूक 15 : 1 (IRVMR)
हरवलेले मेंढरू
मत्त. 18:10-14 सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते.
लूक 15 : 2 (IRVMR)
तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!”
लूक 15 : 3 (IRVMR)
मग येशूने त्यांनाही दाखला सांगितला.
लूक 15 : 4 (IRVMR)
“तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानात सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय?
लूक 15 : 5 (IRVMR)
आणि जेव्हा त्यास ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो.
लूक 15 : 6 (IRVMR)
आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.
लूक 15 : 7 (IRVMR)
त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.
लूक 15 : 8 (IRVMR)
हरवलेले नाणे किंवा एका स्त्रीकडे चांदीची दहा नाणी आहेत आणि जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय?
लूक 15 : 9 (IRVMR)
आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.
लूक 15 : 10 (IRVMR)
त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.”
लूक 15 : 11 (IRVMR)
उधळ्या मुलगा व त्याचा वडील भाऊ मग येशू म्हणाला, “एका मनुष्यास दोन पुत्र होते.
लूक 15 : 12 (IRVMR)
त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या. आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली.
लूक 15 : 13 (IRVMR)
त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली.
लूक 15 : 14 (IRVMR)
त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली.
लूक 15 : 15 (IRVMR)
त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले.
लूक 15 : 16 (IRVMR)
तेव्हा कोणी त्यास काहीही* खावयास न दिल्याने न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई.
लूक 15 : 17 (IRVMR)
नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे!
लूक 15 : 18 (IRVMR)
आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे.
लूक 15 : 19 (IRVMR)
तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या.
लूक 15 : 20 (IRVMR)
मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले.
लूक 15 : 21 (IRVMR)
मुलगा त्यास म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार† मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही नाही.
लूक 15 : 22 (IRVMR)
परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला.
लूक 15 : 23 (IRVMR)
आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू!
लूक 15 : 24 (IRVMR)
कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले.
लूक 15 : 25 (IRVMR)
यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला.
लूक 15 : 26 (IRVMR)
त्याने एका नोकराला बोलावून विचारले, हे सर्व काय चालले आहे?
लूक 15 : 27 (IRVMR)
तो नोकर त्यास म्हणाला, तुमचा भाऊ आला आहे. तो तुमच्या पित्याला सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी मोठी मेजवानी ठेवली आहे.
लूक 15 : 28 (IRVMR)
तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेर येऊन त्यास समजावू लागला.
लूक 15 : 29 (IRVMR)
परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पाहा, इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा‡ खाण्यासाठी दिले नाही.
लूक 15 : 30 (IRVMR)
आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली.
लूक 15 : 31 (IRVMR)
तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे.
लूक 15 : 32 (IRVMR)
परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32