मार्क 1 : 1 (IRVMR)
बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
मत्त. 3:1-12; लूक 3:1-12; योहा. 1:19-28
मार्क 1 : 2 (IRVMR)
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;
मार्क 1 : 3 (IRVMR)
अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’ ”
मार्क 1 : 4 (IRVMR)
त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.
मार्क 1 : 5 (IRVMR)
यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
मार्क 1 : 6 (IRVMR)
योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे.
मार्क 1 : 7 (IRVMR)
तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.
मार्क 1 : 8 (IRVMR)
मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
मार्क 1 : 9 (IRVMR)
येशूचा बाप्तिस्मा
मत्त. 3:13-17; लूक 3:21-22; योहा. 1:29-34 त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला.
मार्क 1 : 10 (IRVMR)
येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले.
मार्क 1 : 11 (IRVMR)
तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
मार्क 1 : 12 (IRVMR)
येशूची परीक्षा
मत्त. 4:1-11; लूक 4:1-11 मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले.
मार्क 1 : 13 (IRVMR)
सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.
मार्क 1 : 14 (IRVMR)
येशूच्या लौकिक कार्याचा प्रारंभ
मत्त. 4:12-17; लूक 4:14-15 योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.
मार्क 1 : 15 (IRVMR)
तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
मार्क 1 : 16 (IRVMR)
पहिल्या शिष्यांना पाचारण
मत्त. 4:18-22; लूक 5:1-11 येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
मार्क 1 : 17 (IRVMR)
येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”
मार्क 1 : 18 (IRVMR)
मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
मार्क 1 : 19 (IRVMR)
तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले.
मार्क 1 : 20 (IRVMR)
त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
मार्क 1 : 21 (IRVMR)
कफर्णहूमातील सभास्थानांत येशू शिक्षण देतो व अशुद्ध आत्मा काढतो नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.
मार्क 1 : 22 (IRVMR)
त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
मार्क 1 : 23 (IRVMR)
त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
मार्क 1 : 24 (IRVMR)
आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.”
मार्क 1 : 25 (IRVMR)
परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
मार्क 1 : 26 (IRVMR)
“नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.”
मार्क 1 : 27 (IRVMR)
लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!”
मार्क 1 : 28 (IRVMR)
येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.
मार्क 1 : 29 (IRVMR)
पेत्राची सासू व इतर रोगी यांना येशू बरे करतो
मत्त. 8:14-15; लूक 4:38-39 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.
मार्क 1 : 30 (IRVMR)
शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.
मार्क 1 : 31 (IRVMR)
तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.
मार्क 1 : 32 (IRVMR)
संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.
मार्क 1 : 33 (IRVMR)
सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले.
मार्क 1 : 34 (IRVMR)
त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.
मार्क 1 : 35 (IRVMR)
येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफर्णहूम सोडतो
मत्त. 4:23-25; लूक 4:42-44 मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
मार्क 1 : 36 (IRVMR)
शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,
मार्क 1 : 37 (IRVMR)
व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.”
मार्क 1 : 38 (IRVMR)
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”
मार्क 1 : 39 (IRVMR)
मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.
मार्क 1 : 40 (IRVMR)
येशू कुष्ठरोग्याला बरे करतो
मत्त. 8:1-4; लूक 5:12-16 एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
मार्क 1 : 41 (IRVMR)
येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
मार्क 1 : 42 (IRVMR)
आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.
मार्क 1 : 43 (IRVMR)
येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.
मार्क 1 : 44 (IRVMR)
आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”
मार्क 1 : 45 (IRVMR)
परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45