मार्क 3 : 1 (IRVMR)
शब्बाथ दिवशी हात वाळलेल्या मनुष्यास बरे करणे
मत्त. 12:9-14; लूक 6:6-11 मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता.
मार्क 3 : 2 (IRVMR)
येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.
मार्क 3 : 3 (IRVMR)
येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.”
मार्क 3 : 4 (IRVMR)
नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले.
मार्क 3 : 5 (IRVMR)
मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.
मार्क 3 : 6 (IRVMR)
नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.
मार्क 3 : 7 (IRVMR)
येशू पुष्कळ रोग्यास बरे करतो
मत्त. 12:15-21 मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला.
मार्क 3 : 8 (IRVMR)
यरूशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला.
मार्क 3 : 9 (IRVMR)
मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले.
मार्क 3 : 10 (IRVMR)
कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते.
मार्क 3 : 11 (IRVMR)
जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
मार्क 3 : 12 (IRVMR)
पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.
मार्क 3 : 13 (IRVMR)
बारा प्रेषितांची निवड
मत्त. 10:1-4; लूक 6:12-16 मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले.
मार्क 3 : 14 (IRVMR)
तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे.
मार्क 3 : 15 (IRVMR)
व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा.
मार्क 3 : 16 (IRVMR)
मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले.
मार्क 3 : 17 (IRVMR)
जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले.
मार्क 3 : 18 (IRVMR)
अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
मार्क 3 : 19 (IRVMR)
आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
मार्क 3 : 20 (IRVMR)
सैतानाच्या साहाय्याने येशू आपली कामे करीतो या आरोपास त्याने दिलेले उत्तर
मत्त. 12:22-30; लूक 11:14-23 मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना.
मार्क 3 : 21 (IRVMR)
त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते.
मार्क 3 : 22 (IRVMR)
तसेच यरूशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल * सैतान आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो.
मार्क 3 : 23 (IRVMR)
मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील?
मार्क 3 : 24 (IRVMR)
आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही.
मार्क 3 : 25 (IRVMR)
आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही.
मार्क 3 : 26 (IRVMR)
जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल.
मार्क 3 : 27 (IRVMR)
खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.”
मार्क 3 : 28 (IRVMR)
मी तुम्हास खरे सांगतो की, “लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
मार्क 3 : 29 (IRVMR)
पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
मार्क 3 : 30 (IRVMR)
येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते.
मार्क 3 : 31 (IRVMR)
येशूचे वास्तविक नातेवाईक
मत्त. 12:46-50; लूक 8:19-21 तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले.
मार्क 3 : 32 (IRVMR)
लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.”
मार्क 3 : 33 (IRVMR)
त्याने त्यांना उत्तर दिले, “माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?”
मार्क 3 : 34 (IRVMR)
मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ.
मार्क 3 : 35 (IRVMR)
जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35