मार्क 5 : 1 (IRVMR)
{गरसेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो} [PS] मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले.
मार्क 5 : 2 (IRVMR)
तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला.
मार्क 5 : 3 (IRVMR)
तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते.
मार्क 5 : 4 (IRVMR)
कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते.
मार्क 5 : 5 (IRVMR)
तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे.
मार्क 5 : 6 (IRVMR)
येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला.
मार्क 5 : 7 (IRVMR)
आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.”
मार्क 5 : 8 (IRVMR)
कारण येशू त्यास म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.”
मार्क 5 : 9 (IRVMR)
त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत.
मार्क 5 : 10 (IRVMR)
आणि आम्हास या देशातून घालवू नकोस” अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता.
मार्क 5 : 11 (IRVMR)
तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.
मार्क 5 : 12 (IRVMR)
तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.”
मार्क 5 : 13 (IRVMR)
मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला.
मार्क 5 : 14 (IRVMR)
डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.
मार्क 5 : 15 (IRVMR)
ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली.
मार्क 5 : 16 (IRVMR)
ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली.
मार्क 5 : 17 (IRVMR)
तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले.
मार्क 5 : 18 (IRVMR)
मग तो तारवात जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य त्यास विनंती करू लागला की, मलाही तुमच्या सोबत घ्या.
मार्क 5 : 19 (IRVMR)
परंतु त्याने त्यास आपल्या सोबत येऊ दिले नाही, तर त्यास म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”
मार्क 5 : 20 (IRVMR)
तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस येथे जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मत्त. 9:18-26; लूक 8:40-56 [PE][PS]
मार्क 5 : 21 (IRVMR)
{याईराची कन्या} [PS] मग येशू तारवात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो सरोवराजवळ होता.
मार्क 5 : 22 (IRVMR)
तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी येथे आला व त्यास पाहून त्याच्या पाया पडला.
मार्क 5 : 23 (IRVMR)
त्याने आग्रहाने त्यास विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”
मार्क 5 : 24 (IRVMR)
मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालत होते आणि त्याच्याभोवती गर्दी करीत होते. [PS]
मार्क 5 : 25 (IRVMR)
{येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो} [PS] आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती.
मार्क 5 : 26 (IRVMR)
तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते.
मार्क 5 : 27 (IRVMR)
येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला.
मार्क 5 : 28 (IRVMR)
कारण ती म्हणत होती, “केवळ याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन.”
मार्क 5 : 29 (IRVMR)
तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.
मार्क 5 : 30 (IRVMR)
आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?”
मार्क 5 : 31 (IRVMR)
त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहा, तरी आपण म्हणता, मला कोणी स्पर्श केला?”
मार्क 5 : 32 (IRVMR)
मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले.
मार्क 5 : 33 (IRVMR)
तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्यास सर्वकाही सत्य सांगितले.
मार्क 5 : 34 (IRVMR)
तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” [PS]
मार्क 5 : 35 (IRVMR)
{येशू याईराच्या मुलीला जिवंत करतो} [PS] येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्यास म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?”
मार्क 5 : 36 (IRVMR)
परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.”
मार्क 5 : 37 (IRVMR)
त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही.
मार्क 5 : 38 (IRVMR)
मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली.
मार्क 5 : 39 (IRVMR)
तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.”
मार्क 5 : 40 (IRVMR)
तेव्हा ते त्यास हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई-वडील व आपल्याबरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.
मार्क 5 : 41 (IRVMR)
नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम,” याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.”
मार्क 5 : 42 (IRVMR)
आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले.
मार्क 5 : 43 (IRVMR)
हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खाण्यास द्या असे सांगितले. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: