मत्तय 1 : 1 (IRVMR)
येशू ख्रिस्ताची वंशावळ
रूथ 4:18-22; 1 इति. 2:1-5; लूक 3:23-38
अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ.
मत्तय 1 : 2 (IRVMR)
अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले.
मत्तय 1 : 3 (IRVMR)
यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला.
मत्तय 1 : 4 (IRVMR)
अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन,
मत्तय 1 : 5 (IRVMR)
सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.
मत्तय 1 : 6 (IRVMR)
आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला.
मत्तय 1 : 7 (IRVMR)
शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला.
मत्तय 1 : 8 (IRVMR)
आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया,
मत्तय 1 : 9 (IRVMR)
उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया,
मत्तय 1 : 10 (IRVMR)
हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया,
मत्तय 1 : 11 (IRVMR)
आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.
मत्तय 1 : 12 (IRVMR)
बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला.
मत्तय 1 : 13 (IRVMR)
जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला.
मत्तय 1 : 14 (IRVMR)
अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला.
मत्तय 1 : 15 (IRVMR)
एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब,
मत्तय 1 : 16 (IRVMR)
याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला.
मत्तय 1 : 17 (IRVMR)
अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
मत्तय 1 : 18 (IRVMR)
येशू ख्रिस्ताचा जन्म
लूक 2:1-7
येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.
मत्तय 1 : 19 (IRVMR)
मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला.
मत्तय 1 : 20 (IRVMR)
तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.
मत्तय 1 : 21 (IRVMR)
ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”
मत्तय 1 : 22 (IRVMR)
प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे,
मत्तय 1 : 23 (IRVMR)
“पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
मत्तय 1 : 24 (IRVMR)
तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला.
मत्तय 1 : 25 (IRVMR)
तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25