मत्तय 5 : 1 (IRVMR)
{डोंगरावरचे प्रवचन} (लूक 6:20-26) [PS] जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
मत्तय 5 : 2 (IRVMR)
त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला; [PE][PS]
मत्तय 5 : 3 (IRVMR)
“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, [QBR2] कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. [QBR]
मत्तय 5 : 4 (IRVMR)
‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, [QBR2] कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ [QBR]
मत्तय 5 : 5 (IRVMR)
‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, [QBR2] कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’ [QBR]
मत्तय 5 : 6 (IRVMR)
जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, [QBR2] कारण ते संतुष्ट होतील. [QBR]
मत्तय 5 : 7 (IRVMR)
जे दयाळू ते धन्य आहेत, [QBR] कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. [QBR]
मत्तय 5 : 8 (IRVMR)
जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, [QBR2] कारण ते देवाला पाहतील. [QBR]
मत्तय 5 : 9 (IRVMR)
जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. [QBR]
मत्तय 5 : 10 (IRVMR)
न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, [QBR] कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. [PE][PS]
मत्तय 5 : 11 (IRVMR)
जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात.
मत्तय 5 : 12 (IRVMR)
आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला. [PS]
मत्तय 5 : 13 (IRVMR)
{मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे} (मार्क 9:50; लूक 14:34) [PS] तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील.
मत्तय 5 : 14 (IRVMR)
तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही.
मत्तय 5 : 15 (IRVMR)
आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो.
मत्तय 5 : 16 (IRVMR)
तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. [PS]
मत्तय 5 : 17 (IRVMR)
{जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण} [PS] नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे.
मत्तय 5 : 18 (IRVMR)
कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
मत्तय 5 : 19 (IRVMR)
यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.
मत्तय 5 : 20 (IRVMR)
म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही. [PS]
मत्तय 5 : 21 (IRVMR)
{राग व खून} (लूक 12:57-59) [PS] ‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्याय‍सभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
मत्तय 5 : 22 (IRVMR)
मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्याय‍सभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.
मत्तय 5 : 23 (IRVMR)
यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली,
मत्तय 5 : 24 (IRVMR)
तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.
मत्तय 5 : 25 (IRVMR)
तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील.
मत्तय 5 : 26 (IRVMR)
मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस. [PS]
मत्तय 5 : 27 (IRVMR)
{अशुद्धता} [PS] ‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे,
मत्तय 5 : 28 (IRVMR)
मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;
मत्तय 5 : 29 (IRVMR)
तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
मत्तय 5 : 30 (IRVMR)
तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. [PE][PS]
मत्तय 5 : 31 (IRVMR)
‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते.
मत्तय 5 : 32 (IRVMR)
मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. [PS]
मत्तय 5 : 33 (IRVMR)
{शपथ व खरेपणा} [PS] आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
मत्तय 5 : 34 (IRVMR)
मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे;
मत्तय 5 : 35 (IRVMR)
पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.
मत्तय 5 : 36 (IRVMR)
आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.
मत्तय 5 : 37 (IRVMR)
तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे. [PS]
मत्तय 5 : 38 (IRVMR)
{सूड} (लूक 6:29-31) [PS] ‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
मत्तय 5 : 39 (IRVMR)
परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;
मत्तय 5 : 40 (IRVMR)
जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे;
मत्तय 5 : 41 (IRVMR)
आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.
मत्तय 5 : 42 (IRVMR)
जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको. लूक 6:27-28, 32-36 [PE][PS]
मत्तय 5 : 43 (IRVMR)
{प्रेम व सर्वांगपूर्ण शील} [PS] ‘आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
मत्तय 5 : 44 (IRVMR)
मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
मत्तय 5 : 45 (IRVMR)
अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
मत्तय 5 : 46 (IRVMR)
कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही?
मत्तय 5 : 47 (IRVMR)
आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना?
मत्तय 5 : 48 (IRVMR)
यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: