मीखा 6 : 1 (IRVMR)
इस्त्राएलाशी परमेश्वराचा वाद आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. मीखा त्यास म्हणाला, ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.
मीखा 6 : 2 (IRVMR)
पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, परमेश्वराचा वाद ऐका, कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे, आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे.
मीखा 6 : 3 (IRVMR)
“माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे.
मीखा 6 : 4 (IRVMR)
कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले, मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले.
मीखा 6 : 5 (IRVMR)
माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा, त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत* यार्देनच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील शिट्टीम येथे इस्राएल लोकांची शेवटची छावणी होती (यहोशवा 3:1), आणि पश्चिम किनाऱ्यावरील गिलगाल येथे वचनदत्त भूमीतील पहिली छावणी होती (यहोशवा 4:19). यार्देन नदीला चमत्कारिकरित्या पार करण्याची घटना या दोन छावणीच्या दरम्यान घडली (यहोशवा 3-4). येऊन त्यास कसे उत्तर दिले, त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.”
मीखा 6 : 6 (IRVMR)
परमेश्वरास काय हवे? मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?
मीखा 6 : 7 (IRVMR)
हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय?
मीखा 6 : 8 (IRVMR)
हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
मीखा 6 : 9 (IRVMR)
परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते. जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो, म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
मीखा 6 : 10 (IRVMR)
अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत.
मीखा 6 : 11 (IRVMR)
मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो?
मीखा 6 : 12 (IRVMR)
त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत. त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.
मीखा 6 : 13 (IRVMR)
म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे, तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे.
मीखा 6 : 14 (IRVMR)
तू खाशील पण तृप्त होणार नाही, तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील, तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही, आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन.
मीखा 6 : 15 (IRVMR)
तू पेरशील, पण कापणी करणार नाही; तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील, पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही; तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.
मीखा 6 : 16 (IRVMR)
कारण अम्रीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16