नहेम्या 7 : 1 (IRVMR)
नहेम्या यरूशलेमेवर अधिकारी नेमतो तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली.
नहेम्या 7 : 2 (IRVMR)
यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरूशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
नहेम्या 7 : 3 (IRVMR)
आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरूशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
नहेम्या 7 : 4 (IRVMR)
आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.
नहेम्या 7 : 5 (IRVMR)
बंदिवासातून परतणाऱ्यांची यादी
नहेम्या 7 : 6 (IRVMR)
माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे. बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने या लोकांस बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरूशलेम आणि यहूदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
नहेम्या 7 : 7 (IRVMR)
जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
नहेम्या 7 : 8 (IRVMR)
परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर,
नहेम्या 7 : 9 (IRVMR)
शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर,
नहेम्या 7 : 10 (IRVMR)
आरहचे वंशज सहाशें बावन्न.
नहेम्या 7 : 11 (IRVMR)
येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा,
नहेम्या 7 : 12 (IRVMR)
एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न,
नहेम्या 7 : 13 (IRVMR)
जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस,
नहेम्या 7 : 15 (IRVMR)
बिन्नुईचे वंशज सहाशें अठ्ठेचाळीस,
नहेम्या 7 : 16 (IRVMR)
बेबाईचे वंशज सहाशें अठ्ठावीस
नहेम्या 7 : 17 (IRVMR)
अजगादचे वंशज दोन हजार तीनशे बावीस,
नहेम्या 7 : 18 (IRVMR)
अदोनीकामचे वंशज सहाशें सदुसष्ट.
नहेम्या 7 : 19 (IRVMR)
बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट,
नहेम्या 7 : 20 (IRVMR)
आदीनाचे वंशज सहाशें पंचावन्न,
नहेम्या 7 : 21 (IRVMR)
हिज्कीयाच्या कुटुंबातील आटेराचे वंशज अठ्याण्णव,
नहेम्या 7 : 22 (IRVMR)
हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस.
नहेम्या 7 : 23 (IRVMR)
बेसाईचे वंशज तीनशे चोवीस,
नहेम्या 7 : 26 (IRVMR)
बेथलहेम आणि नटोफा येथील माणसे एकशे अठ्याऐंशी.
नहेम्या 7 : 27 (IRVMR)
अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस,
नहेम्या 7 : 28 (IRVMR)
बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस,
नहेम्या 7 : 29 (IRVMR)
किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथयातली माणसे सातशे त्रेचाळीस,
नहेम्या 7 : 30 (IRVMR)
रामा आणि गिबातली माणसे सहाशे एकवीस.
नहेम्या 7 : 31 (IRVMR)
मिखमाशाची माणसे एकशे बावीस,
नहेम्या 7 : 32 (IRVMR)
बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस,
नहेम्या 7 : 33 (IRVMR)
दुसऱ्या नबोची माणसे बावन्न,
नहेम्या 7 : 34 (IRVMR)
दुसऱ्या एलामाची माणसे एक हजार दोनशे चौपन्न.
नहेम्या 7 : 36 (IRVMR)
यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस,
नहेम्या 7 : 37 (IRVMR)
लोद, हादीद व ओनो याचे वंशज सातशे एकवीस,
नहेम्या 7 : 38 (IRVMR)
सनाहाचे वंशज तीन हजार नऊशें तीस.
नहेम्या 7 : 39 (IRVMR)
याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर
नहेम्या 7 : 40 (IRVMR)
इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न,
नहेम्या 7 : 41 (IRVMR)
पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस,
नहेम्या 7 : 42 (IRVMR)
हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
नहेम्या 7 : 43 (IRVMR)
लेवी:होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर
नहेम्या 7 : 44 (IRVMR)
गाणारे:आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस,
नहेम्या 7 : 45 (IRVMR)
द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस.
नहेम्या 7 : 46 (IRVMR)
हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज,
नहेम्या 7 : 57 (IRVMR)
शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा
नहेम्या 7 : 59 (IRVMR)
शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन.
नहेम्या 7 : 60 (IRVMR)
मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते.
नहेम्या 7 : 61 (IRVMR)
तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरूशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः
नहेम्या 7 : 62 (IRVMR)
दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस.
नहेम्या 7 : 63 (IRVMR)
आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई).
नहेम्या 7 : 64 (IRVMR)
काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले.
नहेम्या 7 : 65 (IRVMR)
अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम* निर्ग. 28:30 पहा घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते.
नहेम्या 7 : 66 (IRVMR)
सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते.
नहेम्या 7 : 67 (IRVMR)
यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस स्त्री-पुरुष सेवक व दोनशे पंचेचाळीस गायक व गायिका होत्या.
नहेम्या 7 : 68 (IRVMR)
त्यांच्याजवळ सातशे छत्तीस घोडे, दोनशे पंचेचाळीस खेचरे,
नहेम्या 7 : 69 (IRVMR)
चारशे पस्तीस उंट आणि सहा हजार सातशे वीस गाढवे होती.
नहेम्या 7 : 70 (IRVMR)
घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक† साधारण 8.4 किलोग्राम सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली.
नहेम्या 7 : 71 (IRVMR)
काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक‡ साधारण 170 किलोग्राम सोने आणि दोन हजार दोनशे माने § साधारण 1,300 किलोग्राम रुपे देखील दिले.
नहेम्या 7 : 72 (IRVMR)
इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली.
नहेम्या 7 : 73 (IRVMR)
अशाप्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73