गणना 1 : 1 (IRVMR)
{सीनाय येथे झालेली इस्त्राएल लोकांची शिरगणती} [PS] इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला,
गणना 1 : 2 (IRVMR)
सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.
गणना 1 : 3 (IRVMR)
वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा. [PE][PS]
गणना 1 : 4 (IRVMR)
प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हास मदत करील.
गणना 1 : 5 (IRVMR)
तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे हीः [QBR] रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;
गणना 1 : 6 (IRVMR)
शिमोन वंशातला सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल. [PE][PS]
गणना 1 : 7 (IRVMR)
यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन; [QBR]
गणना 1 : 8 (IRVMR)
इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल; [QBR]
गणना 1 : 9 (IRVMR)
जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब. [PE][PS]
गणना 1 : 10 (IRVMR)
योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल. [QBR]
गणना 1 : 11 (IRVMR)
बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान. [PE][PS]
गणना 1 : 12 (IRVMR)
दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर; [QBR]
गणना 1 : 13 (IRVMR)
आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल; [QBR]
गणना 1 : 14 (IRVMR)
गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप; [QBR]
गणना 1 : 15 (IRVMR)
नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा. [PE][PS]
गणना 1 : 16 (IRVMR)
हे लोकांतून निवडलेले माणसे होती, त्यांच्या पूर्वजांच्या वंशाचे अधिपती होते. ते इस्राएलाच्या कुळाचे प्रमुख होते. [PE][PS]
गणना 1 : 17 (IRVMR)
ज्यांच्या नावाची नोंद होती त्या मनुष्यांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले;
गणना 1 : 18 (IRVMR)
आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.
गणना 1 : 19 (IRVMR)
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली. [PE][PS]
गणना 1 : 20 (IRVMR)
इस्राएलाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्याच्याप्रमाणे करण्यात आली.
गणना 1 : 21 (IRVMR)
रऊबेनाच्या वंशातले मोजलेले एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 22 (IRVMR)
शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
गणना 1 : 23 (IRVMR)
शिमोनाच्या वंशातले मोजलेले एकूण एकोणसाठ हजार तीनशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 24 (IRVMR)
गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;
गणना 1 : 25 (IRVMR)
गादाच्या वंशातले मोजलेले एकूण पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली. [PE][PS]
गणना 1 : 26 (IRVMR)
यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
गणना 1 : 27 (IRVMR)
यहूदाच्या वंशातले मोजलेले एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 28 (IRVMR)
इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
गणना 1 : 29 (IRVMR)
इस्साखाराच्या वंशातले मोजलेले एकूण चौपन्न हजार चारशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 30 (IRVMR)
जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;
गणना 1 : 31 (IRVMR)
जबुलून वंशातील मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 32 (IRVMR)
योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
गणना 1 : 33 (IRVMR)
एफ्राइमाच्या वंशातले मोजलेले एकूण चाळीस हजार पाचशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 34 (IRVMR)
मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
गणना 1 : 35 (IRVMR)
मनश्शेच्या वंशात मोजलेले एकूण बत्तीस हजार दोनशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 36 (IRVMR)
बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
गणना 1 : 37 (IRVMR)
बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण पस्तीस हजार चारशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 38 (IRVMR)
दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
गणना 1 : 39 (IRVMR)
दानाच्या वंशातले मोजलेले एकूण बासष्ट हजार सातशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 40 (IRVMR)
आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
गणना 1 : 41 (IRVMR)
आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 42 (IRVMR)
नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.
गणना 1 : 43 (IRVMR)
नफतालीच्या वंशातील मोजलेले एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली. [PE][PS]
गणना 1 : 44 (IRVMR)
मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली.
गणना 1 : 45 (IRVMR)
इस्राएली वंशातले वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.
गणना 1 : 46 (IRVMR)
ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली. [PS]
गणना 1 : 47 (IRVMR)
{निवासमंडपाच्या सेवेसाठी लेवी लोकांची नेमणूक} [PS] इस्राएल लोकांबरोबर लेव्याची नोद त्यांच्या वडिलांच्या वंशावरून घेतली नव्हती.
गणना 1 : 48 (IRVMR)
परमेश्वराने मोशेला सांगितले होते की,
गणना 1 : 49 (IRVMR)
लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको. [PE][PS]
गणना 1 : 50 (IRVMR)
लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.
गणना 1 : 51 (IRVMR)
जेव्हा निवासमंडप हलवावयाचा असेल तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; कोणी परका जवळ आला तर त्यास जिवे मारावे.
गणना 1 : 52 (IRVMR)
इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ द्यावेत. [PE][PS]
गणना 1 : 53 (IRVMR)
परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.
गणना 1 : 54 (IRVMR)
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले. [PE]
❮
❯