गणना 26 : 1 (IRVMR)
मवाब देशात इस्त्राएल लोकांची शिरगणती मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
गणना 26 : 2 (IRVMR)
“इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
गणना 26 : 3 (IRVMR)
तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,
गणना 26 : 4 (IRVMR)
मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.
गणना 26 : 5 (IRVMR)
रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
गणना 26 : 6 (IRVMR)
हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
गणना 26 : 7 (IRVMR)
रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
गणना 26 : 9 (IRVMR)
अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
गणना 26 : 10 (IRVMR)
त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
गणना 26 : 11 (IRVMR)
परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.
गणना 26 : 12 (IRVMR)
शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ,
गणना 26 : 13 (IRVMR)
जेरहाचे जेरही कूळ, शौलाचे शौली कूळ.
गणना 26 : 14 (IRVMR)
ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
गणना 26 : 15 (IRVMR)
गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,
गणना 26 : 16 (IRVMR)
आजनीचे आजनी कूळ, एरीचे एरी कूळ,
गणना 26 : 17 (IRVMR)
अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
गणना 26 : 18 (IRVMR)
गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
गणना 26 : 19 (IRVMR)
जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
गणना 26 : 20 (IRVMR)
यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ
गणना 26 : 21 (IRVMR)
पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.
गणना 26 : 22 (IRVMR)
ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
गणना 26 : 23 (IRVMR)
इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
गणना 26 : 24 (IRVMR)
याशूबाचे याशूबी कूळ, शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.
गणना 26 : 25 (IRVMR)
इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.
गणना 26 : 26 (IRVMR)
जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
गणना 26 : 27 (IRVMR)
जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
गणना 26 : 28 (IRVMR)
योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
गणना 26 : 29 (IRVMR)
मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.
गणना 26 : 30 (IRVMR)
गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.
गणना 26 : 31 (IRVMR)
अस्रियेलाचे अस्रियेली कूळ, शेखेमाचे शेखेमी कूळ.
गणना 26 : 32 (IRVMR)
शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ.
गणना 26 : 33 (IRVMR)
हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
गणना 26 : 34 (IRVMR)
ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
गणना 26 : 35 (IRVMR)
एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
गणना 26 : 36 (IRVMR)
एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.
गणना 26 : 37 (IRVMR)
ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
गणना 26 : 38 (IRVMR)
बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ.
गणना 26 : 39 (IRVMR)
शफूफामाचे शफूफामी कूळ, हुफामाचे हुफामी कूळ.
गणना 26 : 40 (IRVMR)
40 बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.
गणना 26 : 41 (IRVMR)
ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.
गणना 26 : 42 (IRVMR)
दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.
गणना 26 : 43 (IRVMR)
शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.
गणना 26 : 44 (IRVMR)
आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.
गणना 26 : 45 (IRVMR)
45 बरीयाच्या कुळातील कुळे होतीः हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ.
गणना 26 : 46 (IRVMR)
46 आशेरला सेरा नावाची मुलगी होती.
गणना 26 : 47 (IRVMR)
ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
गणना 26 : 48 (IRVMR)
नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ.
गणना 26 : 49 (IRVMR)
येसेराचे येसेरी कूळ, शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.
गणना 26 : 50 (IRVMR)
50 ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.
गणना 26 : 52 (IRVMR)
ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती. चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
गणना 26 : 53 (IRVMR)
त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
गणना 26 : 54 (IRVMR)
मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल.
गणना 26 : 55 (IRVMR)
देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.
गणना 26 : 56 (IRVMR)
प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील.
गणना 26 : 57 (IRVMR)
लेवी लोकांची कुळे त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ.
गणना 26 : 58 (IRVMR)
58 लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.
गणना 26 : 59 (IRVMR)
अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
गणना 26 : 60 (IRVMR)
नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
गणना 26 : 61 (IRVMR)
पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले.
गणना 26 : 62 (IRVMR)
लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.
गणना 26 : 63 (IRVMR)
पहिल्या शिरगणतीतले कालेब व यहोशवा मात्र हयात मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
गणना 26 : 64 (IRVMR)
खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
गणना 26 : 65 (IRVMR)
कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65