गणना 28 : 1 (IRVMR)
दैनिक अर्पणे परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
गणना 28 : 2 (IRVMR)
इस्राएल लोकांस आज्ञा दे आणि त्यांना सांग की, माझे अर्पण, म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न, तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा.
गणना 28 : 3 (IRVMR)
आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वरास अर्पावे ते हे आहेः त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे.
गणना 28 : 4 (IRVMR)
एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
गणना 28 : 5 (IRVMR)
हातकुटीच्या पाव हिन* साधारण एक लिटर तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे † साधारण एक किलोग्राम अन्नार्पण करावे.
गणना 28 : 6 (IRVMR)
हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे.
गणना 28 : 7 (IRVMR)
त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे.
गणना 28 : 8 (IRVMR)
दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर.
गणना 28 : 9 (IRVMR)
शब्बाथ आणि मासिक अर्पणे “प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी.
गणना 28 : 10 (IRVMR)
नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बाथ दिवशी अर्पावा.”
गणना 28 : 11 (IRVMR)
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
गणना 28 : 12 (IRVMR)
प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ.
गणना 28 : 13 (IRVMR)
आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे.
गणना 28 : 14 (IRVMR)
लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धा हीन, व प्रत्येक मेंढ्याकरता एकतृतीयांश हीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थाश हीन इतका द्राक्षरस असावा, वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे.
गणना 28 : 15 (IRVMR)
आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वरास पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा.
गणना 28 : 16 (IRVMR)
नेमून दिलेल्या सणांत करायची अर्पणे परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.
गणना 28 : 17 (IRVMR)
बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
गणना 28 : 18 (IRVMR)
या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करायचे नाही.
गणना 28 : 19 (IRVMR)
तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
गणना 28 : 20 (IRVMR)
त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांस एफा आणि त्या मेंढ्याच्यामागे दोन दशमांस एफा,
गणना 28 : 21 (IRVMR)
आणि सात कोकरापैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे.
गणना 28 : 22 (IRVMR)
तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.
गणना 28 : 23 (IRVMR)
सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे.
गणना 28 : 24 (IRVMR)
याप्रमाणे वल्हाडणाचे सात दिवस दररोज परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा, निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण याव्यतिरिक्त हे अर्पण असावे.
गणना 28 : 25 (IRVMR)
नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्यादिवशी काहीही अंगमेहनीतीचे काम करू नये.
गणना 28 : 26 (IRVMR)
सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये.
गणना 28 : 27 (IRVMR)
तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा.
गणना 28 : 28 (IRVMR)
आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे.
गणना 28 : 29 (IRVMR)
व त्या सात कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
गणना 28 : 30 (IRVMR)
आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला एक बकरा अर्पावा.
गणना 28 : 31 (IRVMR)
आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण करायचे ते निर्दोष असावे; त्याबरोबरची पेयार्पणे सुद्धा अर्पावी.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31