गणना 29 : 1 (IRVMR)
सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. हा तुमचा कर्णा वाजवण्याचा दिवस आहे.
गणना 29 : 2 (IRVMR)
परमेश्वरास मधुर सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षांची सात निर्दोष कोकरे होमबलि म्हणून अर्पण करावी. [PE][PS]
गणना 29 : 3 (IRVMR)
त्याबरोबरचे अन्नार्पण तेलांत मळलेल्या सपीठाचे असावे, गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
गणना 29 : 4 (IRVMR)
मेंढ्याबरोबर आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करावे.
गणना 29 : 5 (IRVMR)
तुम्हासाठी प्रायश्चित करायला पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. [PE][PS]
गणना 29 : 6 (IRVMR)
चंद्रदर्शनाचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे याव्यतिरिक्त परमेश्वरास मधुर सुवासासाठी अग्नीतून केलेले हे अर्पण असावे. [PE][PS]
गणना 29 : 7 (IRVMR)
सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.
गणना 29 : 8 (IRVMR)
तुम्ही परमेश्वरास मधुर सुवास मिळावा म्हणून होमार्पणे करावे ते हे, तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्ष वयाचे सात निर्दोष कोकरे अर्पण करावेत. [PE][PS]
गणना 29 : 9 (IRVMR)
आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
गणना 29 : 10 (IRVMR)
सात कोकरांपैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
गणना 29 : 11 (IRVMR)
पापार्पणासाठी एक बकराही अर्पावा. याखेरीज प्रायश्चित्ताचे पापार्पण व निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, पेयार्पणे ही असावीत. [PE][PS]
गणना 29 : 12 (IRVMR)
सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.
गणना 29 : 13 (IRVMR)
तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास आनंदीत करील. तुम्ही तेरा गोऱ्हे, दोन मेंढे, एकएक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे, ही दोषरहित असावी. [PE][PS]
गणना 29 : 14 (IRVMR)
त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. तेरा गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेंढ्यापैकी प्रत्येक मेंढ्याबरोबर दोन दशमांश एफा,
गणना 29 : 15 (IRVMR)
आणि चौदा कोकरापैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
गणना 29 : 16 (IRVMR)
आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या अन्नार्पण व त्यांची पेयार्पण ही अर्पणे असावीत. [PE][PS]
गणना 29 : 17 (IRVMR)
दुसऱ्या दिवशी तुम्ही बारा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.
गणना 29 : 18 (IRVMR)
त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात अन्नार्पण आणि पेयार्पण विधिपूर्वक करावी.
गणना 29 : 19 (IRVMR)
आणि पापार्पणासाठी एक बकरा म्हणून द्यावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्यांची पेयार्पण ही असावीत. [PE][PS]
गणना 29 : 20 (IRVMR)
तिसऱ्या दिवशी तुम्ही अकरा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
गणना 29 : 21 (IRVMR)
त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण केले पाहिजे.
गणना 29 : 22 (IRVMR)
पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे निरंतरचे होमार्पण व अन्नार्पण व त्यांचे पेयार्पणाव्यतिरिक्त असावी. [PE][PS]
गणना 29 : 23 (IRVMR)
चौथ्या दिवशी तुम्ही दहा गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
गणना 29 : 24 (IRVMR)
गोऱ्हे, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणही नियमाप्रमाणे करावी.
गणना 29 : 25 (IRVMR)
आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, त्याचे अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी. [PE][PS]
गणना 29 : 26 (IRVMR)
पाचव्या दिवशी तुम्ही नऊ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
गणना 29 : 27 (IRVMR)
त्या बरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
गणना 29 : 28 (IRVMR)
एक बकरा पापार्पणासाठी म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, त्याचे पेयार्पण ही असावी. [PE][PS]
गणना 29 : 29 (IRVMR)
सहाव्या दिवशी तुम्ही आठ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
गणना 29 : 30 (IRVMR)
आणि त्यांबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण, व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
गणना 29 : 31 (IRVMR)
एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी. [PE][PS]
गणना 29 : 32 (IRVMR)
सातव्या दिवशी तुम्ही सात गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
गणना 29 : 33 (IRVMR)
त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणे नियमपूर्वक करावी.
गणना 29 : 34 (IRVMR)
एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण अर्पावी. [PE][PS]
गणना 29 : 35 (IRVMR)
आठव्या दिवशी तुमच्यासाठी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये.
गणना 29 : 36 (IRVMR)
तुम्ही परमेश्वरास मधुर सुवासाचे होमार्पण, अग्नीतून केलेले अर्पण म्हणून तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात निर्दोष कोकरे अर्पावी. [PE][PS]
गणना 29 : 37 (IRVMR)
आणि त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यांसाठी व कोकरासाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक अर्पण करावी.
गणना 29 : 38 (IRVMR)
एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण, व त्यांचे पेयार्पण अर्पावा. [PE][PS]
गणना 29 : 39 (IRVMR)
तुमचे नवस व स्वखुशीचे या व्यतिरिक्त नेमलेल्या सणात हे होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणे परमेश्वरास अर्पावी.
गणना 29 : 40 (IRVMR)
मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांस सांगितल्या. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: