गणना 30 : 1 (IRVMR)
स्त्रियांनी केलेल्या नवसांसंबंधी नियम मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.
गणना 30 : 2 (IRVMR)
जर एखाद्याने परमेश्वरास नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे.
गणना 30 : 3 (IRVMR)
एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात राहत असेल आणि तिने परमेश्वरास खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
गणना 30 : 4 (IRVMR)
जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
गणना 30 : 5 (IRVMR)
गणना 30 : 6 (IRVMR)
पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील. आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.
गणना 30 : 7 (IRVMR)
तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी.
गणना 30 : 8 (IRVMR)
गणना 30 : 9 (IRVMR)
पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील. विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
गणना 30 : 10 (IRVMR)
आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वरास काही नवस केला असेल,
गणना 30 : 11 (IRVMR)
तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील.
गणना 30 : 12 (IRVMR)
गणना 30 : 13 (IRVMR)
पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्यास महत्व नाही. तिचा पती वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील. लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वरास काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.
गणना 30 : 14 (IRVMR)
पती यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो.
गणना 30 : 15 (IRVMR)
पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी.
गणना 30 : 16 (IRVMR)
परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16