गणना 34 : 1 (IRVMR)
परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
गणना 34 : 2 (IRVMR)
इस्राएल लोकांस ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.
गणना 34 : 3 (IRVMR)
दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हास मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.
गणना 34 : 4 (IRVMR)
तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.
गणना 34 : 5 (IRVMR)
असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल.
गणना 34 : 7 (IRVMR)
तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे. तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी.
गणना 34 : 8 (IRVMR)
होर पर्वतावरुन ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला.
गणना 34 : 9 (IRVMR)
नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.
गणना 34 : 10 (IRVMR)
तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.
गणना 34 : 11 (IRVMR)
शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.
गणना 34 : 12 (IRVMR)
आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.
गणना 34 : 13 (IRVMR)
तेव्हा मोशेने इस्राएल लोकांस आज्ञा केली व म्हणाला की, चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हास मिळणार आहे. म्हणजे साडे नऊ वंशाना जो देश देण्याचे परमेश्वराने देण्याचे ठरविले आहे तो हाच.
गणना 34 : 14 (IRVMR)
रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे.
गणना 34 : 15 (IRVMR)
त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे.
गणना 34 : 16 (IRVMR)
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
गणना 34 : 17 (IRVMR)
जो पुरुष हा देश तुम्हास वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.
गणना 34 : 18 (IRVMR)
प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा.
गणना 34 : 19 (IRVMR)
त्या मनुष्यांची नावे ही आहेत यहूदाच्या वंशातला, यफुन्नेचा मुलगा कालेब.
गणना 34 : 20 (IRVMR)
शिमोनाच्या वंशातील, अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.
गणना 34 : 21 (IRVMR)
बन्यामिनाच्या वंशातील, किसलोनाचा मुलगा अलीदाद.
गणना 34 : 22 (IRVMR)
दानी वंशातील, सरदार यागलीचा मुलगा बुक्की.
गणना 34 : 23 (IRVMR)
योसेफाच्या वंशातील, सरदार मनश्शेच्या वंशातील, एफोदाचा मुलगा हन्नीएल.
गणना 34 : 24 (IRVMR)
एफ्राईम वंशातील, सरदार शिफटानाचा मुलगा कमुवेल.
गणना 34 : 25 (IRVMR)
जबुलून वंशातील सरदार पनीकाचा मुलगा अलीसाफान.
गणना 34 : 26 (IRVMR)
इस्साखार वंशातील सरदार अज्जानाचा मुलगा पलटीयेल.
गणना 34 : 27 (IRVMR)
आशेरी वंशातील सरदार शलोमीचा मुलगा अहीहूद.
गणना 34 : 28 (IRVMR)
आणि नफताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.
गणना 34 : 29 (IRVMR)
29 परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या मनुष्यांची निवड केली.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29