गणना 7 : 1 (IRVMR)
{वेदीच्या समर्पणाच्या प्रसंगी करायची अर्पणे} [PS] ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.
गणना 7 : 2 (IRVMR)
त्यादिवशी, जे इस्राएलांचे अधिपती, त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे अर्पिली; हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते. याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते.
गणना 7 : 3 (IRVMR)
त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या. [PE][PS]
गणना 7 : 4 (IRVMR)
मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
गणना 7 : 5 (IRVMR)
“त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.” [PE][PS]
गणना 7 : 6 (IRVMR)
मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले.
गणना 7 : 7 (IRVMR)
त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
गणना 7 : 8 (IRVMR)
त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती. [PE][PS]
गणना 7 : 9 (IRVMR)
परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते. [PE][PS]
गणना 7 : 10 (IRVMR)
मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.
गणना 7 : 11 (IRVMR)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.” [PE][PS]
गणना 7 : 12 (IRVMR)
पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 13 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 14 (IRVMR)
त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे, एक सोन्याचे पात्र आणले. [PE][PS]
गणना 7 : 15 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 16 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 17 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यासाठी दिली. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती. [PE][PS]
गणना 7 : 18 (IRVMR)
दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 19 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी अर्पिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या. [PE][PS]
गणना 7 : 20 (IRVMR)
त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
गणना 7 : 21 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरु ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 22 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 23 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती. [PE][PS]
गणना 7 : 24 (IRVMR)
तिसऱ्या दिवशी, जबुलून वंशाचा अधिपती हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 25 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी दिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 26 (IRVMR)
त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. [PE][PS]
गणना 7 : 27 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 28 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 29 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
गणना 7 : 30 (IRVMR)
चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 31 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 32 (IRVMR)
त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले. [PE][PS]
गणना 7 : 33 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले.
गणना 7 : 34 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 35 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 36 (IRVMR)
पांचव्या दिवशी, शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 37 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होते. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 38 (IRVMR)
त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले. [PE][PS]
गणना 7 : 39 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 40 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 41 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल यांचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 42 (IRVMR)
सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 43 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 44 (IRVMR)
त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. [PE][PS]
गणना 7 : 45 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 46 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 47 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे ही अर्पिण्यास दिली, हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 48 (IRVMR)
सातव्या दिवशी, एफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 49 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 50 (IRVMR)
त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. [PE][PS]
गणना 7 : 51 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 52 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 53 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा यांचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 54 (IRVMR)
आठव्या दिवशी, मनश्शे वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 55 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 56 (IRVMR)
त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. [PE][PS]
गणना 7 : 57 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 58 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 59 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल याचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 60 (IRVMR)
नवव्या दिवशी, बन्यामीन वंशाचा अधिपती गीदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 61 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 62 (IRVMR)
त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. [PE][PS]
गणना 7 : 63 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 64 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 65 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 66 (IRVMR)
दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 67 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 68 (IRVMR)
त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. [PE][PS]
गणना 7 : 69 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 70 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 71 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिले. हे अम्मीशाद्दै याचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 72 (IRVMR)
अकराव्या दिवशी, आशेर वंशाचा अधिकारी आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 73 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 74 (IRVMR)
त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले. [PE][PS]
गणना 7 : 75 (IRVMR)
त्याने होमार्पणासाठी एक गोऱ्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नर कोकरू दिले.
गणना 7 : 76 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 77 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे आक्रानाचा मुलगा पगीयेल याचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 78 (IRVMR)
बाराव्या दिवशी, नफताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
गणना 7 : 79 (IRVMR)
त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा होता. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
गणना 7 : 80 (IRVMR)
त्याने धूपाने भरलेले, दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
गणना 7 : 81 (IRVMR)
त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
गणना 7 : 82 (IRVMR)
त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
गणना 7 : 83 (IRVMR)
त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते. [PE][PS]
गणना 7 : 84 (IRVMR)
मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी इस्राएलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची बारा ताटे, चांदीच्या बारा वाट्या आणि सोन्याची बारा पात्रे समर्पित केली.
गणना 7 : 85 (IRVMR)
प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन दोन हजार चारशे शेकेल होते.
गणना 7 : 86 (IRVMR)
धूपाने भरलेले सोन्याची बारा पात्रे, प्रत्येकी पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे दहा शेकेल वजन होते. [PE][PS]
गणना 7 : 87 (IRVMR)
त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.
गणना 7 : 88 (IRVMR)
शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पणे केली. [PE][PS]
गणना 7 : 89 (IRVMR)
जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शनमंडपामध्ये गेला, त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षीकोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे दोन करुबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला. [PE]
❮
❯