फिलेमोना 1 : 1 (IRVMR)
प्रस्तावना पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान आणि भाऊ तीमथ्य यांच्याकडून; आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन ह्यास,
फिलेमोना 1 : 2 (IRVMR)
आणि बहीण अफ्फिया हिला व अर्खिप आमचा सोबतीचा शिपाई यास व तुझ्या घरी जी ख्रिस्ती मंडळी आहे तिला,
फिलेमोना 1 : 3 (IRVMR)
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
फिलेमोना 1 : 4 (IRVMR)
एका पळून गेलेल्या गुलामातर्फे विनंती मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो;
फिलेमोना 1 : 5 (IRVMR)
कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे, त्यांविषयी मी ऐकले आहे.
फिलेमोना 1 : 6 (IRVMR)
आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील सहभागीपण कार्यकारी व्हावे.
फिलेमोना 1 : 7 (IRVMR)
कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत.
फिलेमोना 1 : 8 (IRVMR)
याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे.
फिलेमोना 1 : 9 (IRVMR)
तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
फिलेमोना 1 : 10 (IRVMR)
मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो.
फिलेमोना 1 : 11 (IRVMR)
तो पूर्वी तुला निरुपयोगी होता पण आता, तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे.
फिलेमोना 1 : 12 (IRVMR)
म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जिवालाच, तुझ्याकडे परत पाठवले आहे.
फिलेमोना 1 : 13 (IRVMR)
सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.
फिलेमोना 1 : 14 (IRVMR)
पण, तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
फिलेमोना 1 : 15 (IRVMR)
कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने सर्वकाळासाठी तुझे व्हावे.
फिलेमोना 1 : 16 (IRVMR)
त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे, मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक प्रिय असावा.
फिलेमोना 1 : 17 (IRVMR)
म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा स्वीकार कर.
फिलेमोना 1 : 18 (IRVMR)
त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मांड.
फिलेमोना 1 : 19 (IRVMR)
मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे; मी स्वतः त्याची फेड करीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करीत नाही.
फिलेमोना 1 : 20 (IRVMR)
हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; ख्रिस्ताच्या ठायी माझ्या जिवाला विश्रांती दे.
फिलेमोना 1 : 21 (IRVMR)
समाप्ति तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे; आणि मी जाणतो की, तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील.
फिलेमोना 1 : 22 (IRVMR)
शिवाय माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनांमुळे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी आशा मी करत आहे.
फिलेमोना 1 : 23 (IRVMR)
ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास, हा तुला नमस्कार पाठवत आहे;
फिलेमोना 1 : 24 (IRVMR)
आणि तसेच माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात.
फिलेमोना 1 : 25 (IRVMR)
आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25