फिलिप्पैकरांस 2 : 1 (IRVMR)
ऐक्याप्रीत्यर्थ विनंती ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
फिलिप्पैकरांस 2 : 2 (IRVMR)
तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
फिलिप्पैकरांस 2 : 3 (IRVMR)
नम्रतेप्रीत्यर्थ विनंती आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे.
फिलिप्पैकरांस 2 : 4 (IRVMR)
तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेहि पाहा.
फिलिप्पैकरांस 2 : 5 (IRVMR)
प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो.
फिलिप्पैकरांस 2 : 6 (IRVMR)
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
फिलिप्पैकरांस 2 : 7 (IRVMR)
तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले,
फिलिप्पैकरांस 2 : 8 (IRVMR)
आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
फिलिप्पैकरांस 2 : 9 (IRVMR)
ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे.
फिलिप्पैकरांस 2 : 10 (IRVMR)
ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,
फिलिप्पैकरांस 2 : 11 (IRVMR)
आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
फिलिप्पैकरांस 2 : 12 (IRVMR)
सत्शील तारणप्राप्तीचा पुरावा आहे म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.
फिलिप्पैकरांस 2 : 13 (IRVMR)
कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.
फिलिप्पैकरांस 2 : 14 (IRVMR)
जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा;
फिलिप्पैकरांस 2 : 15 (IRVMR)
ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.
फिलिप्पैकरांस 2 : 16 (IRVMR)
जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
फिलिप्पैकरांस 2 : 17 (IRVMR)
तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
फिलिप्पैकरांस 2 : 18 (IRVMR)
आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
फिलिप्पैकरांस 2 : 19 (IRVMR)
तीमथ्य प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल.
फिलिप्पैकरांस 2 : 20 (IRVMR)
कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा, दुसरा कोणी समान वृतीचा माझ्याजवळ नाही;
फिलिप्पैकरांस 2 : 21 (IRVMR)
कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.
फिलिप्पैकरांस 2 : 22 (IRVMR)
पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो, तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली.
फिलिप्पैकरांस 2 : 23 (IRVMR)
म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो.
फिलिप्पैकरांस 2 : 24 (IRVMR)
पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे.
फिलिप्पैकरांस 2 : 25 (IRVMR)
एपफ्रदीत तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले.
फिलिप्पैकरांस 2 : 26 (IRVMR)
कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;
फिलिप्पैकरांस 2 : 27 (IRVMR)
तो खरोखर, मरणाजवळ आला होता पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली.
फिलिप्पैकरांस 2 : 28 (IRVMR)
म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.
फिलिप्पैकरांस 2 : 29 (IRVMR)
ह्यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशांचा मान राखा.
फिलिप्पैकरांस 2 : 30 (IRVMR)
कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30