नीतिसूत्रे 1 : 1 (IRVMR)
{नीतिसूत्रांचे मोल} [PS] इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 2 (IRVMR)
ज्ञान व शिक्षण शिकावे, [QBR] बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे, [QBR]
नीतिसूत्रे 1 : 3 (IRVMR)
सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, [QBR]
नीतिसूत्रे 1 : 4 (IRVMR)
भोळ्यांना शहाणपण [QBR] आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे, [QBR]
नीतिसूत्रे 1 : 5 (IRVMR)
ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, [QBR] बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे, [QBR]
नीतिसूत्रे 1 : 6 (IRVMR)
ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, [QBR] म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 7 (IRVMR)
परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, [QBR] मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.
नीतिसूत्रे 1 : 8 (IRVMR)
{आदेश आणि ताकीद} [PS] माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, [QBR] आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; [QBR]
नीतिसूत्रे 1 : 9 (IRVMR)
ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन [QBR] आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 10 (IRVMR)
माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, [QBR] तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; [QBR]
नीतिसूत्रे 1 : 11 (IRVMR)
जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; [QBR] आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 12 (IRVMR)
जसे अधोलोक निरोग्यांना गिळून [QBR] गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 13 (IRVMR)
आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; [QBR] आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 14 (IRVMR)
तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, [QBR] आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.” [QBR]
नीतिसूत्रे 1 : 15 (IRVMR)
माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; [QBR] ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस; [QBR]
नीतिसूत्रे 1 : 16 (IRVMR)
त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, [QBR] आणि ते रक्त पाडायला घाई करतात. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 17 (IRVMR)
एखादा पक्षी पाहत असतांना, [QBR] त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 18 (IRVMR)
ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. [QBR] ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 19 (IRVMR)
जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; [QBR] अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते.
नीतिसूत्रे 1 : 20 (IRVMR)
{ज्ञानाची विनंती} [PS] ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, [QBR] ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते; [QBR]
नीतिसूत्रे 1 : 21 (IRVMR)
ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, [QBR] शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते, [QBR]
नीतिसूत्रे 1 : 22 (IRVMR)
“अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? [QBR] तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, [QBR] आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार? [QBR]
नीतिसूत्रे 1 : 23 (IRVMR)
तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; [QBR] मी आपले विचार तुम्हावर ओतीन; [QBR] मी आपली वचने तुम्हास कळवीन. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 24 (IRVMR)
मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; [QBR] मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 25 (IRVMR)
परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला [QBR] आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 26 (IRVMR)
म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, [QBR] तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 27 (IRVMR)
जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, [QBR] आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; [QBR] जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 28 (IRVMR)
ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; [QBR] ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 29 (IRVMR)
कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; [QBR] आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही, [QBR]
नीतिसूत्रे 1 : 30 (IRVMR)
त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, [QBR] आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 31 (IRVMR)
म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील [QBR] आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 32 (IRVMR)
कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; [QBR] आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील. [QBR]
नीतिसूत्रे 1 : 33 (IRVMR)
परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. [QBR] आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: