नीतिसूत्रे 10 : 1 (IRVMR)
{सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना} [PS] ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत. [QBR] शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो, [QBR] पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु:खी करतो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 2 (IRVMR)
दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. [QBR] पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 3 (IRVMR)
परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, [QBR] परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 4 (IRVMR)
आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात. [QBR] पण उद्योग्याचा हात संपत्ती मिळवतो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 5 (IRVMR)
उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे, [QBR] परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 6 (IRVMR)
नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, [QBR] पण बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 7 (IRVMR)
नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते; [QBR] पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 8 (IRVMR)
जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 9 (IRVMR)
जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, [QBR] परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 10 (IRVMR)
जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, [QBR] बडबड्या मूर्खाची अधोगती होते [* खुले शब्दताडण शांती प्रस्थापित करते ] . [QBR]
नीतिसूत्रे 10 : 11 (IRVMR)
नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे, [QBR] परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 12 (IRVMR)
द्वेष भांडण उत्पन्न करतो; [QBR] परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 13 (IRVMR)
विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, [QBR] परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 14 (IRVMR)
शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात, [QBR] परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 15 (IRVMR)
श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; [QBR] गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 16 (IRVMR)
नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे; [QBR] दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 17 (IRVMR)
जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे, [QBR] पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 18 (IRVMR)
जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, [QBR] आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 19 (IRVMR)
जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही, [QBR] परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 20 (IRVMR)
जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे; [QBR] पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 21 (IRVMR)
नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, [QBR] पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 22 (IRVMR)
परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, [QBR] आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 23 (IRVMR)
दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, [QBR] परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 24 (IRVMR)
दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, [QBR] पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 25 (IRVMR)
दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, [QBR] पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 26 (IRVMR)
जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, [QBR] तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 27 (IRVMR)
परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, [QBR] पण दुष्टाचे वर्ष कमी होतील. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 28 (IRVMR)
नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, [QBR] पण दुष्टाची वर्षे कमी होतील. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 29 (IRVMR)
जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, [QBR] दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 30 (IRVMR)
नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, [QBR] परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 31 (IRVMR)
नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते, [QBR] पण कपटी जीभ कापली जाईल. [QBR]
नीतिसूत्रे 10 : 32 (IRVMR)
नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, [QBR] पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: