नीतिसूत्रे 11 : 1 (IRVMR)
यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, [QBR] पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 2 (IRVMR)
जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, [QBR] पण विनम्रते बरोबर ज्ञान येते. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 3 (IRVMR)
सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, [QBR] पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 4 (IRVMR)
क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे, [QBR] परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 5 (IRVMR)
निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, [QBR] परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 6 (IRVMR)
जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, [QBR] पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 7 (IRVMR)
जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; [QBR] आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 8 (IRVMR)
नीतिमान संकटापासून दूर राहतो; [QBR] आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 9 (IRVMR)
अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, [QBR] पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 10 (IRVMR)
जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते; [QBR] जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 11 (IRVMR)
जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते; [QBR] दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 12 (IRVMR)
जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, [QBR] परंतु समजदार मनुष्य शांत राहतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 13 (IRVMR)
जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, [QBR] परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 14 (IRVMR)
जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते, [QBR] पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 15 (IRVMR)
जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल, [QBR] परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 16 (IRVMR)
कृपाळू स्त्रीस आदर मिळतो, [QBR] परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 17 (IRVMR)
दयाळू मनुष्य आपले हित करतो, [QBR] पण जो क्रूर असतो तो स्वत:ला इजा करून घेतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 18 (IRVMR)
दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो, [QBR] परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 19 (IRVMR)
जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल, [QBR] पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 20 (IRVMR)
जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे, [QBR] पण ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत त्यांच्याविषयी त्यास आनंद वाटतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 21 (IRVMR)
दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, [QBR] परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 22 (IRVMR)
डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, [QBR] तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 23 (IRVMR)
जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात; [QBR] पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 24 (IRVMR)
तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; [QBR] दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 25 (IRVMR)
उदार मनाचा इसम समृद्ध होतो, [QBR] आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 26 (IRVMR)
जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात, [QBR] पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 27 (IRVMR)
जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो, [QBR] पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 28 (IRVMR)
जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, [QBR] परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 29 (IRVMR)
जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल, [QBR] आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 30 (IRVMR)
नीतिमानाचे जीवन वृक्षासारखे आहे, [QBR] पण हिंसाचार जीवन दूर नेतो. [QBR]
नीतिसूत्रे 11 : 31 (IRVMR)
जर नीतिमानाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ मिळते; [QBR] तर दुर्जनाला व पाप्याला किती अधिक मिळेल! [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: