नीतिसूत्रे 13 : 1 (IRVMR)
सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, परंतु निंदक निषेध ऐकत नाही.
नीतिसूत्रे 13 : 2 (IRVMR)
आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.
नीतिसूत्रे 13 : 3 (IRVMR)
जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
नीतिसूत्रे 13 : 4 (IRVMR)
आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.
नीतिसूत्रे 13 : 5 (IRVMR)
नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो.
नीतिसूत्रे 13 : 6 (IRVMR)
नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.
नीतिसूत्रे 13 : 7 (IRVMR)
जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे.
नीतिसूत्रे 13 : 8 (IRVMR)
श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.
नीतिसूत्रे 13 : 9 (IRVMR)
नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.
नीतिसूत्रे 13 : 10 (IRVMR)
गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.
नीतिसूत्रे 13 : 11 (IRVMR)
वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.
नीतिसूत्रे 13 : 12 (IRVMR)
जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
नीतिसूत्रे 13 : 13 (IRVMR)
जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.
नीतिसूत्रे 13 : 14 (IRVMR)
सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.
नीतिसूत्रे 13 : 15 (IRVMR)
सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.
नीतिसूत्रे 13 : 16 (IRVMR)
शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
नीतिसूत्रे 13 : 17 (IRVMR)
दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.
नीतिसूत्रे 13 : 18 (IRVMR)
जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल.
नीतिसूत्रे 13 : 19 (IRVMR)
इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.
नीतिसूत्रे 13 : 20 (IRVMR)
शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.
नीतिसूत्रे 13 : 21 (IRVMR)
आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.
नीतिसूत्रे 13 : 22 (IRVMR)
चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.
नीतिसूत्रे 13 : 23 (IRVMR)
गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.
नीतिसूत्रे 13 : 24 (IRVMR)
जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
नीतिसूत्रे 13 : 25 (IRVMR)
जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.
❮
❯