नीतिसूत्रे 15 : 1 (IRVMR)
शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.
नीतिसूत्रे 15 : 2 (IRVMR)
सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.
नीतिसूत्रे 15 : 3 (IRVMR)
परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात.
नीतिसूत्रे 15 : 4 (IRVMR)
आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे.
नीतिसूत्रे 15 : 5 (IRVMR)
मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.
नीतिसूत्रे 15 : 6 (IRVMR)
नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते.
नीतिसूत्रे 15 : 7 (IRVMR)
ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही.
नीतिसूत्रे 15 : 8 (IRVMR)
दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.
नीतिसूत्रे 15 : 9 (IRVMR)
दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो.
नीतिसूत्रे 15 : 10 (IRVMR)
जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल.
नीतिसूत्रे 15 : 11 (IRVMR)
अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत?
नीतिसूत्रे 15 : 12 (IRVMR)
निंदकाला शिक्षेची चीड येते; तो सुज्ञाकडे जात नाही.
नीतिसूत्रे 15 : 13 (IRVMR)
आनंदी हृदय मुख आनंदित करते, पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो.
नीतिसूत्रे 15 : 14 (IRVMR)
बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते.
नीतिसूत्रे 15 : 15 (IRVMR)
जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे.
नीतिसूत्रे 15 : 16 (IRVMR)
पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.
नीतिसूत्रे 15 : 17 (IRVMR)
पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा, जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे.
नीतिसूत्रे 15 : 18 (IRVMR)
रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो.
नीतिसूत्रे 15 : 19 (IRVMR)
आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
नीतिसूत्रे 15 : 20 (IRVMR)
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.
नीतिसूत्रे 15 : 21 (IRVMR)
बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो. पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो.
नीतिसूत्रे 15 : 22 (IRVMR)
जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात.
नीतिसूत्रे 15 : 23 (IRVMR)
मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो; आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!
नीतिसूत्रे 15 : 24 (IRVMR)
सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.
नीतिसूत्रे 15 : 25 (IRVMR)
परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो.
नीतिसूत्रे 15 : 26 (IRVMR)
परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत.
नीतिसूत्रे 15 : 27 (IRVMR)
चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल.
नीतिसूत्रे 15 : 28 (IRVMR)
नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते.
नीतिसूत्रे 15 : 29 (IRVMR)
परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
नीतिसूत्रे 15 : 30 (IRVMR)
नेत्राचा प्रकाश* प्रसन्न चेहरा अंतःकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला † हाडांना निरोगी आहे.
नीतिसूत्रे 15 : 31 (IRVMR)
जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल.
नीतिसूत्रे 15 : 32 (IRVMR)
जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.
नीतिसूत्रे 15 : 33 (IRVMR)
परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते.
❮
❯