नीतिसूत्रे 19 : 1 (IRVMR)
ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.
नीतिसूत्रे 19 : 2 (IRVMR)
ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.
नीतिसूत्रे 19 : 3 (IRVMR)
मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.
नीतिसूत्रे 19 : 4 (IRVMR)
संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.
नीतिसूत्रे 19 : 5 (IRVMR)
खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.
नीतिसूत्रे 19 : 6 (IRVMR)
उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.
नीतिसूत्रे 19 : 7 (IRVMR)
गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.
नीतिसूत्रे 19 : 8 (IRVMR)
जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
नीतिसूत्रे 19 : 9 (IRVMR)
खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
नीतिसूत्रे 19 : 10 (IRVMR)
मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.
नीतिसूत्रे 19 : 11 (IRVMR)
बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.
नीतिसूत्रे 19 : 12 (IRVMR)
राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
नीतिसूत्रे 19 : 13 (IRVMR)
मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.
नीतिसूत्रे 19 : 14 (IRVMR)
घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
नीतिसूत्रे 19 : 15 (IRVMR)
आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
नीतिसूत्रे 19 : 16 (IRVMR)
जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.
नीतिसूत्रे 19 : 17 (IRVMR)
जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.
नीतिसूत्रे 19 : 18 (IRVMR)
काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
नीतिसूत्रे 19 : 19 (IRVMR)
रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.
नीतिसूत्रे 19 : 20 (IRVMR)
सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.
नीतिसूत्रे 19 : 21 (IRVMR)
मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
नीतिसूत्रे 19 : 22 (IRVMR)
प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
नीतिसूत्रे 19 : 23 (IRVMR)
परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.
नीतिसूत्रे 19 : 24 (IRVMR)
आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
नीतिसूत्रे 19 : 25 (IRVMR)
निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.
नीतिसूत्रे 19 : 26 (IRVMR)
जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
नीतिसूत्रे 19 : 27 (IRVMR)
माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.
नीतिसूत्रे 19 : 28 (IRVMR)
भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.
नीतिसूत्रे 19 : 29 (IRVMR)
निंदकासाठी धिक्कार आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत.
❮
❯