नीतिसूत्रे 2 : 1 (IRVMR)
ज्ञानार्जनाचे फायदे माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
नीतिसूत्रे 2 : 2 (IRVMR)
ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
नीतिसूत्रे 2 : 3 (IRVMR)
जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
नीतिसूत्रे 2 : 4 (IRVMR)
जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
नीतिसूत्रे 2 : 5 (IRVMR)
तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
नीतिसूत्रे 2 : 6 (IRVMR)
कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
नीतिसूत्रे 2 : 7 (IRVMR)
जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे,
नीतिसूत्रे 2 : 8 (IRVMR)
तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.
नीतिसूत्रे 2 : 9 (IRVMR)
मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.
नीतिसूत्रे 2 : 10 (IRVMR)
ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.
नीतिसूत्रे 2 : 11 (IRVMR)
दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल.
नीतिसूत्रे 2 : 12 (IRVMR)
ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,
नीतिसूत्रे 2 : 13 (IRVMR)
ते चांगले मार्ग सोडून, अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत.
नीतिसूत्रे 2 : 14 (IRVMR)
जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात.
नीतिसूत्रे 2 : 15 (IRVMR)
ते वाकडे मार्ग अनुसरतात, आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात.
नीतिसूत्रे 2 : 16 (IRVMR)
ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते.
नीतिसूत्रे 2 : 17 (IRVMR)
तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे.
नीतिसूत्रे 2 : 18 (IRVMR)
कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.
नीतिसूत्रे 2 : 19 (IRVMR)
जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही.
नीतिसूत्रे 2 : 20 (IRVMR)
म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.
नीतिसूत्रे 2 : 21 (IRVMR)
कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.
नीतिसूत्रे 2 : 22 (IRVMR)
परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22