नीतिसूत्रे 22 : 1 (IRVMR)
चांगले नाव विपुल धनापेक्षा [QBR] आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 2 (IRVMR)
गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, [QBR] त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 3 (IRVMR)
शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, [QBR] पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 4 (IRVMR)
परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान [QBR] आणि जीवन आणते. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 5 (IRVMR)
कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; [QBR] जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 6 (IRVMR)
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, [QBR] आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 7 (IRVMR)
श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, [QBR] आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 8 (IRVMR)
जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, [QBR] आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 9 (IRVMR)
जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल [QBR] कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 10 (IRVMR)
निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, [QBR] मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 11 (IRVMR)
ज्याला मनाची शुद्धता आवडते, [QBR] आणि ज्याची वाणी कृपामय असते; [QBR] अशांचा मित्र राजा असतो. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 12 (IRVMR)
परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, [QBR] परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 13 (IRVMR)
आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! [QBR] मी उघड्या जागेवर ठार होईल.” [QBR]
नीतिसूत्रे 22 : 14 (IRVMR)
व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; [QBR] ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 15 (IRVMR)
बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, [QBR] पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 16 (IRVMR)
जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, [QBR] किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 17 (IRVMR)
ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, [QBR] आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 18 (IRVMR)
कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, [QBR] आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 19 (IRVMR)
परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, [QBR] म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 20 (IRVMR)
मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान [QBR] ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय? [QBR]
नीतिसूत्रे 22 : 21 (IRVMR)
या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, [QBR] ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय? [QBR]
नीतिसूत्रे 22 : 22 (IRVMR)
गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, [QBR] किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 23 (IRVMR)
कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, [QBR] आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 24 (IRVMR)
जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, [QBR] आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 25 (IRVMR)
तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, [QBR] आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 26 (IRVMR)
दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, [QBR] आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 27 (IRVMR)
जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, [QBR] तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे? [QBR]
नीतिसूत्रे 22 : 28 (IRVMR)
तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, [QBR] तो दगड दूर करू नकोस. [QBR]
नीतिसूत्रे 22 : 29 (IRVMR)
जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; [QBR] तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: