नीतिसूत्रे 23 : 1 (IRVMR)
जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस, तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण * काय आहे याचे निरीक्षण कर,
नीतिसूत्रे 23 : 2 (IRVMR)
आणि जर तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.
नीतिसूत्रे 23 : 3 (IRVMR)
त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको, कारण ती लबाडाची खाद्ये आहेत.
नीतिसूत्रे 23 : 4 (IRVMR)
श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको; तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.
नीतिसूत्रे 23 : 5 (IRVMR)
जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील, आणि अचानक ते पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.
नीतिसूत्रे 23 : 6 (IRVMR)
जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको, आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको,
नीतिसूत्रे 23 : 7 (IRVMR)
तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.
नीतिसूत्रे 23 : 8 (IRVMR)
जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील, आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील.
नीतिसूत्रे 23 : 9 (IRVMR)
मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील.
नीतिसूत्रे 23 : 10 (IRVMR)
जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
नीतिसूत्रे 23 : 11 (IRVMR)
कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे; आणि तो त्यांचा कैवार घेऊन तुमच्याविरुध्द होईल.
नीतिसूत्रे 23 : 12 (IRVMR)
तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
नीतिसूत्रे 23 : 13 (IRVMR)
मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
नीतिसूत्रे 23 : 14 (IRVMR)
जर तुम्ही त्यास छडीने मारले, तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल.
नीतिसूत्रे 23 : 15 (IRVMR)
माझ्या मुला, तू जर शहाणा असलास तर मग, माझ्या मनालाही आनंद होईल.
नीतिसूत्रे 23 : 16 (IRVMR)
तुझे ओठ योग्य ते बोलत असता, माझे अंतर्याम आनंदित होईल.
नीतिसूत्रे 23 : 17 (IRVMR)
तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये, पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.
नीतिसूत्रे 23 : 18 (IRVMR)
कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे; आणि तुझी आशा तोडण्यात येणार नाही.
नीतिसूत्रे 23 : 19 (IRVMR)
माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
नीतिसूत्रे 23 : 20 (IRVMR)
मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.
नीतिसूत्रे 23 : 21 (IRVMR)
कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात, झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.
नीतिसूत्रे 23 : 22 (IRVMR)
तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
नीतिसूत्रे 23 : 23 (IRVMR)
सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
नीतिसूत्रे 23 : 24 (IRVMR)
नीतिमानाचा पिता फार उल्लासेल, आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
नीतिसूत्रे 23 : 25 (IRVMR)
तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे.
नीतिसूत्रे 23 : 26 (IRVMR)
माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत.
नीतिसूत्रे 23 : 27 (IRVMR)
कारण वेश्या ही खोल खड्डा आहे आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे.
नीतिसूत्रे 23 : 28 (IRVMR)
ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
नीतिसूत्रे 23 : 29 (IRVMR)
कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई? कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा? कोणाला आरक्त डोळे आहे?
नीतिसूत्रे 23 : 30 (IRVMR)
जे मद्य पीत रेंगाळतात, जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात.
नीतिसूत्रे 23 : 31 (IRVMR)
जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको.
नीतिसूत्रे 23 : 32 (IRVMR)
पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो.
नीतिसूत्रे 23 : 33 (IRVMR)
तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील; आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील.
नीतिसूत्रे 23 : 34 (IRVMR)
जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.
नीतिसूत्रे 23 : 35 (IRVMR)
तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही. त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही. मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35