नीतिसूत्रे 27 : 1 (IRVMR)
उद्याविषयी बढाई मारू नकोस, [QBR] कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहित नाही. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 2 (IRVMR)
तुझ्या स्वतःच्या मुखाने नव्हे तर दुसऱ्याने तुझी स्तुती करावी, [QBR] तुझ्याच ओठांनी नव्हे तर परक्याने तुझी स्तुती करावी, [QBR]
नीतिसूत्रे 27 : 3 (IRVMR)
दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वजनाने भारी असते, [QBR] पण मुर्खाला डिवचणे या दोन्हीपेक्षा भारी असते. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 4 (IRVMR)
क्रोधाचा क्रूरपणा आणि कोपाचा पूर [QBR] पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल? [QBR]
नीतिसूत्रे 27 : 5 (IRVMR)
गुप्त प्रेमापेक्षा [QBR] उघड निषेध चांगला आहे. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 6 (IRVMR)
मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, [QBR] पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 7 (IRVMR)
जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्यास मधाच्या पोळाचा कंटाळा येतो, [QBR] भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 8 (IRVMR)
जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, [QBR] तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 9 (IRVMR)
सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदीत करतात. [QBR] पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहे. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 10 (IRVMR)
स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस; [QBR] आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको. [QBR] दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 11 (IRVMR)
माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदीत कर, [QBR] नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्यास मी उत्तर देईन. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 12 (IRVMR)
शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो, [QBR] पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 13 (IRVMR)
जो परक्याच्या कर्जासाठी पैसे ठेवून [QBR] जामीन झाला आहे त्याचे वस्त्र ठेवून घे; [QBR] पण जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीसाठी जामीन होतो त्यास तारणादाखल ठेव. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 14 (IRVMR)
जो कोणी पहाटेस उठून आपल्या शेजाऱ्याला मोठ्या आवाजात आशीर्वाद देतो, [QBR] तो त्यास शाप असा गणला जाईल. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 15 (IRVMR)
पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके, [QBR] भांडखोर पत्नी सारखीच आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 16 (IRVMR)
तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे, [QBR] किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 17 (IRVMR)
लोखंड लोखंडाला धारदार करते; [QBR] तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा धारदार करतो. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 18 (IRVMR)
जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल. [QBR] आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 19 (IRVMR)
जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते, [QBR] तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 20 (IRVMR)
मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही. [QBR] त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे [* इच्छा] कधी तृप्त होत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 21 (IRVMR)
रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे; [QBR] आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 22 (IRVMR)
जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले, [QBR] तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 23 (IRVMR)
तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर. [QBR] आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 24 (IRVMR)
संपत्ती कायम टिकत नाही. [QBR] मुकुट तरी सर्व पिढ्यानपिढ्या टिकेल काय? [QBR]
नीतिसूत्रे 27 : 25 (IRVMR)
गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. [QBR] आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 26 (IRVMR)
वस्त्रासाठी कोकरे आहेत, [QBR] आणि बकरे शेताचे मोल आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 27 : 27 (IRVMR)
बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, [QBR] आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: