नीतिसूत्रे 3 : 1 (IRVMR)
आज्ञांकितपणाचा आदेश माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
नीतिसूत्रे 3 : 2 (IRVMR)
कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील.
नीतिसूत्रे 3 : 3 (IRVMR)
विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
नीतिसूत्रे 3 : 4 (IRVMR)
म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील.
नीतिसूत्रे 3 : 5 (IRVMR)
तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;
नीतिसूत्रे 3 : 6 (IRVMR)
तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
नीतिसूत्रे 3 : 7 (IRVMR)
तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.
नीतिसूत्रे 3 : 8 (IRVMR)
हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.
नीतिसूत्रे 3 : 9 (IRVMR)
तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,
नीतिसूत्रे 3 : 10 (IRVMR)
त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.
नीतिसूत्रे 3 : 11 (IRVMR)
माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस,
नीतिसूत्रे 3 : 12 (IRVMR)
जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.
नीतिसूत्रे 3 : 13 (IRVMR)
ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते.
नीतिसूत्रे 3 : 14 (IRVMR)
ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
नीतिसूत्रे 3 : 15 (IRVMR)
ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.
नीतिसूत्रे 3 : 16 (IRVMR)
तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.
नीतिसूत्रे 3 : 17 (IRVMR)
तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.
नीतिसूत्रे 3 : 18 (IRVMR)
जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.
नीतिसूत्रे 3 : 19 (IRVMR)
परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले.
नीतिसूत्रे 3 : 20 (IRVMR)
त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.
नीतिसूत्रे 3 : 21 (IRVMR)
माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.
नीतिसूत्रे 3 : 22 (IRVMR)
ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल.
नीतिसूत्रे 3 : 23 (IRVMR)
नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही;
नीतिसूत्रे 3 : 24 (IRVMR)
तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.
नीतिसूत्रे 3 : 25 (IRVMR)
जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस;
नीतिसूत्रे 3 : 26 (IRVMR)
कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील.
नीतिसूत्रे 3 : 27 (IRVMR)
ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.
नीतिसूत्रे 3 : 28 (IRVMR)
एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.”
नीतिसूत्रे 3 : 29 (IRVMR)
तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो.
नीतिसूत्रे 3 : 30 (IRVMR)
काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही.
नीतिसूत्रे 3 : 31 (IRVMR)
तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.
नीतिसूत्रे 3 : 32 (IRVMR)
कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.
नीतिसूत्रे 3 : 33 (IRVMR)
परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो.
नीतिसूत्रे 3 : 34 (IRVMR)
तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो.
नीतिसूत्रे 3 : 35 (IRVMR)
ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.
❮
❯