नीतिसूत्रे 30 : 1 (IRVMR)
आगूराचे स्वानुभवाचे बोल याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत. त्या पुरुषाने इथीएलाला* मी थकलो आहे, , इथीएलाने उकालाला † मी खूप थकलो आहे सांगितले,
नीतिसूत्रे 30 : 2 (IRVMR)
खचित मी खूप क्रूर आहे मनुष्य नाही; मला मानवजातीप्रमाणे समजदार बुद्धी नाही.
नीतिसूत्रे 30 : 3 (IRVMR)
मी ज्ञान शिकलो नाही, आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही.
नीतिसूत्रे 30 : 4 (IRVMR)
आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे? कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे? कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय? खात्रीने ते तुला माहित आहे काय?
नीतिसूत्रे 30 : 5 (IRVMR)
देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे, जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे.
नीतिसूत्रे 30 : 6 (IRVMR)
त्याच्या वचनात काही भर घालू नको, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील.
नीतिसूत्रे 30 : 7 (IRVMR)
मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो, मी मरण्यापूर्वी त्या मला देण्याचे नाकारू नको.
नीतिसूत्रे 30 : 8 (IRVMR)
पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर; मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस. मला आवश्यक तेवढेच अन्न दे.
नीतिसूत्रे 30 : 9 (IRVMR)
माझी जर अतीतृप्ती झाली तर मी तुला नाकारीन आणि परमेश्वर कोण आहे? असे म्हणेन; मी जर दरिद्री राहिलो तर मी कदाचित् चोरी करेन. आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन.
नीतिसूत्रे 30 : 10 (IRVMR)
सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.
नीतिसूत्रे 30 : 11 (IRVMR)
आपल्या पित्याला शाप देणारा, आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे,
नीतिसूत्रे 30 : 12 (IRVMR)
त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे.
नीतिसूत्रे 30 : 13 (IRVMR)
ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत, आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे.
नीतिसूत्रे 30 : 14 (IRVMR)
गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला, जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे.
नीतिसूत्रे 30 : 15 (IRVMR)
जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही.
नीतिसूत्रे 30 : 16 (IRVMR)
मृत्यूची जागा, वांझ उदर, पाण्याने तहानलेली पृथ्वी आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही.
नीतिसूत्रे 30 : 17 (IRVMR)
जो डोळा पित्याची चेष्टा करतो, किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो, त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील.
नीतिसूत्रे 30 : 18 (IRVMR)
मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.
नीतिसूत्रे 30 : 19 (IRVMR)
आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,
नीतिसूत्रे 30 : 20 (IRVMR)
हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही.
नीतिसूत्रे 30 : 21 (IRVMR)
तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत.
नीतिसूत्रे 30 : 22 (IRVMR)
जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख;
नीतिसूत्रे 30 : 23 (IRVMR)
विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी.
नीतिसूत्रे 30 : 24 (IRVMR)
पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
नीतिसूत्रे 30 : 25 (IRVMR)
मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात.
नीतिसूत्रे 30 : 26 (IRVMR)
ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात.
नीतिसूत्रे 30 : 27 (IRVMR)
टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात.
नीतिसूत्रे 30 : 28 (IRVMR)
पाल आपण हातानी पकडू शकतो, तरी ती राजाच्या महालात सापडते.
नीतिसूत्रे 30 : 29 (IRVMR)
जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे,
नीतिसूत्रे 30 : 30 (IRVMR)
सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही.
नीतिसूत्रे 30 : 31 (IRVMR)
गर्वाने चालणारा कोंबडा युद्धाचा घोडा , बोकड; आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा.
नीतिसूत्रे 30 : 32 (IRVMR)
जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव.
नीतिसूत्रे 30 : 33 (IRVMR)
कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, आणि नाक पिळण्याने रक्त निघते, तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33