नीतिसूत्रे 30 : 1 (IRVMR)
{आगूराचे स्वानुभवाचे बोल} [PS] याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत. [QBR] त्या पुरुषाने इथीएलाला [* मी थकलो आहे, ] , इथीएलाने उकालाला [† मी खूप थकलो आहे] सांगितले, [QBR]
नीतिसूत्रे 30 : 2 (IRVMR)
खचित मी खूप क्रूर आहे मनुष्य नाही; [QBR] मला मानवजातीप्रमाणे समजदार बुद्धी नाही. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 3 (IRVMR)
मी ज्ञान शिकलो नाही, [QBR] आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 4 (IRVMR)
आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे? [QBR] कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे? [QBR] कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे? [QBR] पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? [QBR] त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय? [QBR] खात्रीने ते तुला माहित आहे काय? [QBR]
नीतिसूत्रे 30 : 5 (IRVMR)
देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे, [QBR] जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 6 (IRVMR)
त्याच्या वचनात काही भर घालू नको, [QBR] घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 7 (IRVMR)
मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो, [QBR] मी मरण्यापूर्वी त्या मला देण्याचे नाकारू नको. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 8 (IRVMR)
पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर; [QBR] मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस. [QBR] मला आवश्यक तेवढेच अन्न दे. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 9 (IRVMR)
माझी जर अतीतृप्ती झाली तर मी तुला नाकारीन आणि परमेश्वर कोण आहे? असे म्हणेन; [QBR] मी जर दरिद्री राहिलो तर मी कदाचित् चोरी करेन. [QBR] आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 10 (IRVMR)
सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, [QBR] करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 11 (IRVMR)
आपल्या पित्याला शाप देणारा, [QBR] आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे, [QBR]
नीतिसूत्रे 30 : 12 (IRVMR)
त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, [QBR] पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 13 (IRVMR)
ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत, [QBR] आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 14 (IRVMR)
गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला, [QBR] जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 15 (IRVMR)
जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. [QBR] तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, [QBR] चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 16 (IRVMR)
मृत्यूची जागा, वांझ उदर, [QBR] पाण्याने तहानलेली पृथ्वी [QBR] आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 17 (IRVMR)
जो डोळा पित्याची चेष्टा करतो, [QBR] किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो, [QBR] त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील [QBR] आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 18 (IRVMR)
मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, [QBR] चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 19 (IRVMR)
आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; [QBR] दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, [QBR] समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, [QBR] आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग, [QBR]
नीतिसूत्रे 30 : 20 (IRVMR)
हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, [QBR] आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 21 (IRVMR)
तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, [QBR] आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 22 (IRVMR)
जेव्हा दास राजा होतो, [QBR] अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख; [QBR]
नीतिसूत्रे 30 : 23 (IRVMR)
विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 24 (IRVMR)
पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; [QBR] पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 25 (IRVMR)
मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, [QBR] पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 26 (IRVMR)
ससे हे सशक्त प्राणी नाहीत, [QBR] पण ते खडकात आपले घर करतात. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 27 (IRVMR)
टोळांना राजा नसतो, [QBR] पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 28 (IRVMR)
पाल आपण हातानी पकडू शकतो, [QBR] तरी ती राजाच्या महालात सापडते. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 29 (IRVMR)
जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, [QBR] चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे, [QBR]
नीतिसूत्रे 30 : 30 (IRVMR)
सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे [QBR] तो कोणापासूनही मागे फिरत नाही. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 31 (IRVMR)
गर्वाने चालणारा कोंबडा [‡ युद्धाचा घोडा] , बोकड; [QBR] आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 32 (IRVMR)
जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले [QBR] किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव. [QBR]
नीतिसूत्रे 30 : 33 (IRVMR)
कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, [QBR] आणि नाक पिळण्याने रक्त निघते, [QBR] तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: