नीतिसूत्रे 31 : 1 (IRVMR)
नीतिसूत्रे 31 : 2 (IRVMR)
ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला?
नीतिसूत्रे 31 : 3 (IRVMR)
तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.
नीतिसूत्रे 31 : 4 (IRVMR)
हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.
नीतिसूत्रे 31 : 5 (IRVMR)
ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील.
नीतिसूत्रे 31 : 6 (IRVMR)
जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे.
नीतिसूत्रे 31 : 7 (IRVMR)
त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे.
नीतिसूत्रे 31 : 8 (IRVMR)
जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.
नीतिसूत्रे 31 : 9 (IRVMR)
तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.
नीतिसूत्रे 31 : 10 (IRVMR)
सदगुणी स्त्री हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
नीतिसूत्रे 31 : 11 (IRVMR)
तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही.
नीतिसूत्रे 31 : 12 (IRVMR)
ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही.
नीतिसूत्रे 31 : 13 (IRVMR)
ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.
नीतिसूत्रे 31 : 14 (IRVMR)
ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते.
नीतिसूत्रे 31 : 15 (IRVMR)
रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.
नीतिसूत्रे 31 : 16 (IRVMR)
ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.
नीतिसूत्रे 31 : 17 (IRVMR)
ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.
नीतिसूत्रे 31 : 18 (IRVMR)
आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही.
नीतिसूत्रे 31 : 19 (IRVMR)
ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.
नीतिसूत्रे 31 : 20 (IRVMR)
ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.
नीतिसूत्रे 31 : 21 (IRVMR)
आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते.
नीतिसूत्रे 31 : 22 (IRVMR)
ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते.
नीतिसूत्रे 31 : 23 (IRVMR)
तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.
नीतिसूत्रे 31 : 24 (IRVMR)
ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.
नीतिसूत्रे 31 : 25 (IRVMR)
बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
नीतिसूत्रे 31 : 26 (IRVMR)
तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
नीतिसूत्रे 31 : 27 (IRVMR)
ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही.
नीतिसूत्रे 31 : 28 (IRVMR)
तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,
नीतिसूत्रे 31 : 29 (IRVMR)
“पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.”
नीतिसूत्रे 31 : 30 (IRVMR)
लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
नीतिसूत्रे 31 : 31 (IRVMR)
तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
❮
❯