नीतिसूत्रे 4 : 1 (IRVMR)
ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका, आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
नीतिसूत्रे 4 : 2 (IRVMR)
मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका.
नीतिसूत्रे 4 : 3 (IRVMR)
जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो, माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो,
नीतिसूत्रे 4 : 4 (IRVMR)
त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.
नीतिसूत्रे 4 : 5 (IRVMR)
ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर; माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;
नीतिसूत्रे 4 : 6 (IRVMR)
ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.
नीतिसूत्रे 4 : 7 (IRVMR)
ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर, आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव.
नीतिसूत्रे 4 : 8 (IRVMR)
ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील.
नीतिसूत्रे 4 : 9 (IRVMR)
ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.”
नीतिसूत्रे 4 : 10 (IRVMR)
माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
नीतिसूत्रे 4 : 11 (IRVMR)
मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.
नीतिसूत्रे 4 : 12 (IRVMR)
जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही. आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस.
नीतिसूत्रे 4 : 13 (IRVMR)
शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
नीतिसूत्रे 4 : 14 (IRVMR)
दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको, आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको.
नीतिसूत्रे 4 : 15 (IRVMR)
ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस; त्यापासून मागे फीर आणि दुसऱ्या मार्गाने जा.
नीतिसूत्रे 4 : 16 (IRVMR)
कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.
नीतिसूत्रे 4 : 17 (IRVMR)
कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात.
नीतिसूत्रे 4 : 18 (IRVMR)
परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे; मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे.
नीतिसूत्रे 4 : 19 (IRVMR)
पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत, ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.
नीतिसूत्रे 4 : 20 (IRVMR)
माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे. माझे सांगणे ऐक.
नीतिसूत्रे 4 : 21 (IRVMR)
ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस; ती तुझ्या अंतःकरणात ठेव.
नीतिसूत्रे 4 : 22 (IRVMR)
कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात, आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात.
नीतिसूत्रे 4 : 23 (IRVMR)
तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
नीतिसूत्रे 4 : 24 (IRVMR)
वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव, आणि दूषित बोलणे सोडून दे.
नीतिसूत्रे 4 : 25 (IRVMR)
तुझे डोळे नीट समोर पाहोत, आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
नीतिसूत्रे 4 : 26 (IRVMR)
तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर; मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील.
नीतिसूत्रे 4 : 27 (IRVMR)
तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको; तू आपला पाय वाईटापासून राख.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27